morcha
morcha 
मराठवाडा

राष्ट्रवादी महिला काँग्रेसने काढला बैलगाडी मोर्चा

कैलास चव्हाण

परभणी : विशेष दुष्काळ जाहीर करावा,भारनियमन रद्द करावे आदी मागण्यांसाठी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्यावतीने सोमवारी (ता. 22) जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढून जवाब दो आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा माजी राज्यमंत्री फौजिया खान यांच्या नेतृवात हे आंदोलन झाले. जिंतूर रस्त्यावरील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावरुन निघालेला मोर्चा मोंढा, गव्हाणे चौक, नारायण चाळ, स्टेशन रस्त्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. बैल गाडीमध्ये महिला कार्यकर्त्या घोषणाबाजी करत सहभागी झाल्या होत्या. जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, इंधन दरवाढ कमी करावी अशा विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले. आंदोलनात राष्ट्रीय सचिव सोनाली देशमुख, महिला जिल्हाध्यक्षा भावना नखाते, शहर जिल्हाध्यक्षा नंदा राठोड आदींचा सहभाग होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT