file photo 
मराठवाडा

सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांच्या घरी चोरी; जिंतूरात बलसा रोडवरील घटना

राजाभाऊ नगरकर

जिंतूर ( जिल्हा परभणी ) : कुलुपबंद घर असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी गणपत राठोड यांच्या घरी डल्ला मारला.
सदरची घटना सोमवारी (ता. १५) भल्या पहाटे साडेतीच्या सुमारास शहरातील बलसा रोडवर श्रीसाई मंदिराच्या परिसरात घडल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आली. चोरीच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांत घबराट निर्माण झाली.

गणपत राठोड हे पोलिस खात्यातील दीर्घ सेवेनंतर नुकतेच २८ फेब्रुवारीला निवृत्त झाले असून आठ दिवसापासून शेतीच्या कामानिमित्त घराला टाळे लावून ते पत्नीसह गावाकडे चिंचोली- काळे येथे गेले होते. चोरट्यांनी ही संधी साधून, शिवाय यावेळी याभागात अंधार असल्याचा तसेच लॉकडाऊन सुरू असल्यामुळे रस्त्यावर सामसूम होती. याचा फायदा घेऊन चोरट्यांनी प्रवेशद्वारावरच्या लोखंडी चॅनल गेटचे कुलूप तोडले व नंतर घराच्या दाराचे कुलुप कोंडा तोडून आत प्रवेश केला.

विशेष राठोड यांचे घर निम्म्या रात्रीपर्यंत रहदारी तसेच रात्री उशिरापर्यंत मंदिरात साईभक्ताची ये जा होत असलेल्या मुख्य रस्त्यावर असून दुमजली आहे. वरच्या मजल्यावर किरायेदार राहतात. परंतु पहाटेच्या साखरझोपेमुळे कोणी सावध झाले नाही. शिवाय रात्रीवेळी या भागात पोलिसांची गस्तही नसल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले. घरमालक राठोड यांना सकाळी घरफोडीची माहिती समजताच ते परत आले. पोलिसांनीही घटनास्थळी भेट दिली.परंतु संध्याकाळपर्यंत पोलिस ठाण्यात तक्रार दिली नसल्याने चोरट्यांनी किती ऐवज लंपास केला हे समजू शकले नाही.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT