file photo 
मराठवाडा

नांदेड जिल्ह्यात घरफोडींचे सत्र सुरूच 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : शहर व जिल्ह्यात घरफोडीचे सत्र सुरूच असून पोलिसांना हुलकावणी देत चोरटे घरफोडी करत आहेत. जिल्ह्यात तीन ठिकाणी झालेल्या घरफोडीत दीड लाखाचा ऐवज लंपास करण्यात आला. या प्रकरणी भाग्यनगर, नांदेड ग्रामिण आणि अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल. 

शहराच्या भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडींचे सत्र काही थांबेना. पोलिसांची गस्त कमी झाल्याने चोरटे या हद्दीत नेहमीच सक्रीय असल्याचे वाढत्या घरफोडीच्या घटनांवरून दिसून येते. पोलिसांना मात्र एकाही घरफोडीचा तपास लावण्यात यश येत नाही. अनेकजण तक्रार देण्याससुद्धा समोर येत नाहीत. अनेक झालेल्या घरफोडीचा तपास थंडबस्त्यात असतानाच पुन्हा चोरट्यांनी पोलिसांना आव्हान देत विशालनगर भागात घरफोडी केली. बालाजी रामराव सुर्यवंशी हे आपल्या परिवारासह गावाकडे सरू असलेलया धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. तसेच त्यांचा भाऊ अभ्यासासाठी स्टडीपॉईन्टला घराला कुलूप लावून गेले होते. सोमवारी (ता. १७) दुपारच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश मिळविला. कपाट फोडून ३६ हजाराचे सोन्या- चांदीचे दागिणे लंपास केले. शिक्षक असलेल्या बालाजी सुर्यवंशी यांनी भाग्यनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक व्ही. एम. नागरगोजे करत आहेत.

नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात गुन्हा 

दुसऱ्या घरफोडीत शहराच्या लातुर फाटा (सिडको) परिसरात असलेले अशोक व्यंकटराव जाधव यांचे घर फोडून चोरट्यांनी कपाटातील नगदी ४० हजार रुपये व एक तीन ग्रॅम वजनाची अंगठी असा ५० हजाराचा ऐवज लंपास केला. श्री. जाधव हे रविवारी (ता. १६) आपल्या परिवारासह बाहेरगावी एका लग्नासाठी गेले होते. याची संधी या चोरट्यांनी साधली. अशोक जाधव यांच्या फिर्यादीवरुन नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक फौजदार श्री. गीते करत आहेत. 

अर्धापूर ठाण्यात गुन्हा

तिसऱ्या घटनेत अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव (महादेव) येथील गोपीचंद बालचंद्र बंबरुळे यांचे घर फोडून पर्समधून सोन्या- चांदीचे दागिणे, नगदी आणि मोबाईल असा ५८ हजाराचा ऐवज लंपास केला. ही घटना सोमवारी (ता. १७) दुपारी एक ते दोनच्या सुमारास घडली. या प्रकरणी गोपीचंद बंबरुळे यांच्या फिर्यादीवरुन अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार कपील आगलावे करत आहेत.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT