Accident sakal
मराठवाडा

Vasmat Accident : बसची दुचाकीला धडक; एकाचा जागीच मृत्यू तर महिला गंभीर जखमी

नातेवाईकांचा अंत्यसंस्कार करुन परतीच्या प्रवासात असताना काळाचा घाला...

सकाळ वृत्तसेवा

- संजय बदापुरे

वसमत - वसमत अर्धापूर महामार्गावरील गिरगाव पाटी विशाल ढाब्याजवळ बसने दुचाकीला पाठिमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दांडेगाव ता कळमनुरी येथील एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. जखमी महिलेस उपचारासाठी रुग्णवाहिका व्दारे नांदेडला हलविण्यात आले आहे. ही घटना शुक्रवार ता.४ सायंकाळी ५ वाजता घडली.

दांडेगाव येथील कुंडलीक उन्हाळे वय ६० व केशरबाई उन्हाळे वय ५५ हे दाम्पत्या मालेगाव जिल्हा नांदेड येथे नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी गेले होते. दरम्यान अंत्यसंस्कार आटोपून हे दाम्पत्य दांडेगावकडे दुचाकीवर निघाले असता गिरगाव पाटी विशाल ढाब्याजवळ दांडेगाव रस्त्याकडे वळत असताना पाठिमागुन येणाऱ्या नांदेड-परभणी बसने दुचाकीला पाठिमागून जोराची धडक दिली.

या अपघातात दुचाकीवरील कुंडलीक उन्हाळे यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नी केशरबाई उन्हाळे ह्या गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी महिलेस वसमत येथे प्राथमिक उपचार करुन नांदेड येथे हलविण्यात आले आहे.‌त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे नातेवाईकांनी सांगीतले.

घटनेची माहिती कळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अनिल काचमांडे व पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच प्रेत उत्तरीय तपासणीसाठी वसमत उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT