मराठवाडा

औरंगाबादेत व्यावसायिकाचा गळा आवळून खून

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - मुकुंदवाडी येथील व्यावसायिकाचा शेंद्रा एमआयडीसी भागातील त्यांच्या कंपनीसमोर कारमध्ये संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला. त्यांचा गळा आवळून खून झाल्याचा उलगडा शवविच्छेदन अहवालानंतर झाला. ही घटना सोमवारी (ता. 11) सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली. यात एका संशयिताला चिकलठाणा पोलिसांनी ताब्यात घेतले. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, प्रकाश साळुबा कसारे (वय 48, रा. सिडको एन-2, जे सेक्‍टर, मुकुंदवाडी) असे मृताचे नाव आहे. त्यांची शेंद्रा एमआयडीसी येथे तुषार इंजिनिअरिंग नावाने कंपनी आहे. कंपनीचे शेड उभारण्यात आले असून, ती जागा ते नेहमी किरायाने देत होते. गत दोन ते तीन दिवसांपूर्वीच त्यांनी कंपनीची जागा एका व्यक्तीला किरायाने दिली. कसारे हे नेहमी कामानिमित्त घराबाहेरच राहत होते. रविवारीही ते शेंद्रा एमआयडीसीतील कंपनीत गेले होते. सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांच्या कंपनी परिसरातून जाणाऱ्या नागरिकाला प्रकाश कसारे यांचा मृतदेह त्यांच्याच (एमएच-20, डीएफ-4141) या कारमध्ये समोरील सीटवर दिसून आला. ही बाब नागरिकाने चिकलठाणा पोलिसांना कळविली. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुभाष भुजंग त्यांचे पथक तसेच चिकलठाणा पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सत्यजित ताईतवाले व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत कारसह परिसराची पाहणी केली. दरम्यान, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठविण्यात आला. 

कारमध्ये सापडले झुंबर 
कारमध्ये पोलिसांनी तपासणी केली. त्यावेळी मोबाईल, गॉगल, चप्पल व एक कानातले झुंबर सापडले. या वस्तू पोलिसांनी जप्त करून पंचनामा केला. कसारे यांच्या खूनप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

गळ्यासह मानेवर खुणा 
प्रकाश कसारे यांच्या मानेवर काही खुणा आढळून आल्या आहेत. तसेच त्यांच्या गळ्यावरही व्रण आहेत. उत्तरीय तपासणीनंतर अहवालात गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट आहे. 

मुलगा फोन करीतच राहिला 
प्रकाश कसारे यांच्या पत्नीने त्यांना मोबाईलवर रविवारी रात्री नऊ ते साडेनऊच्या सुमारास संपर्क साधला; पण रात्री उशिरापर्यंत कसारे घरी पोचले नव्हते. म्हणून त्यांच्या मोबाईलवर सलग संपर्क साधणे सुरू होते. 

एक संशयित ताब्यात 
कसारे यांच्या खूनप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा, चिकलठाणा पोलिसांनी सायंकाळी अंकुश तुपे (रा. शेंद्रा एमआयडीसी) याला संशयावरून ताब्यात घेतले, अशी माहिती पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग यांनी दिली. तुपे रविवारीही कसारे यांच्यासोबतच होता. त्याच्यावर पोलिसांनी संशय व्यक्त करीत ताब्यात घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT