मराठवाडा

"बायपास'ने थांबविली "हायवे'ची मोजणी! 

हरी तुगावकर -सकाळ वृत्तसेवा

लातूर - रत्नागिरी - नागपूर हा हायवे लातुरातून जाणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून या हायवेसाठी जमीन संपादनासाठी मोजणी करण्याची प्रक्रिया सुरू होती. औसा व चाकूर तालुक्‍यांत याची मोजणीही झाली आहे. पण लातूर तालुक्‍यातील मोजणी थांबवावी, असे आदेश भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने दिले आहेत. त्यामुळे हायवेसाठीची मोजणी प्रक्रिया थांबली आहे. शहराच्या "बायपास' रस्त्यासाठी आता वाट पाहिली जाणार आहे. त्यामुळे काही महिने तरी हा प्रकल्पच रेंगाळण्याची शक्‍यता आहे. हा "बायपास' कधी होणार अन्‌ कोणाकोणाच्या शेतापासून जाणार याकडे आता लक्ष लागले आहे. 

"बायपास'नंतरच हायवेचा मुहूर्त लागणार आहे. पण याकरिता लातूरकरांना आता शहरापासून किमान सात-आठ किलोमीटर दूर जावे लागण्याची शक्‍यता आहे. 

एकमेव महामार्गाचे नोटिफिकेशन 
लातूर जिल्ह्यातून रत्नागिरी ते नागपूर, जहिराबाद ते लातूर, टेंभुर्णी ते लातूर असे महामार्ग जाणार असल्याचे सांगितले जात आहे. असे असले तरी रत्नागिरी ते नागपूर या एकमेव राष्ट्रीय महामार्गाचे नोटिफिकेशन शासनाने काढले आहे. इतर कोणत्याही महामार्गाचे नोटिफिकेशन अद्याप निघालेले नाही. रत्नागिरी ते नागपूर हा महामार्ग औसा तालुक्‍यातून लातूर पुढे चाकूरमार्गे वारंगा असा जाणार आहे. हा राष्ट्रीय महामार्ग 361 असणार आहे. 

उड्डाणपूल झाला रद्द 
हा राष्ट्रीय महामार्ग लातूर शहरातून जाणार होता. यात राजीव गांधी चौक ते नांदेड नाका असा उड्डाणपूल केला जाणार होता. पण त्याचा शहरातील बाजारपेठेवर परिणाम होईल, अशी तक्रार येथील लोकप्रतिनिधींनी केली. अनेकांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन ही मागणीही लावून धरली होती. यामुळे उड्डाणपूल रद्द झाला आहे. 

सुरवातीला मोजणीची परवानगी 
या महामार्गासाठी औसा व चाकूर तालुक्‍यातील जमीन मोजणी झाली आहे. लातूर तालुक्‍यातील दहा गावांतून हा महामार्ग जाणार आहे. तेथील जमीन मोजणीचे आदेश सुरवातीला प्राधिकरणाने दिले होते. त्यात फक्त उड्डाणपुलाचा भाग सोडून मोजणी करावी, अशा सूचनाही संबंधित विभागाला देण्यात आल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर CJP चा उत्तर प्रदेश सरकारविरोधात मोर्चा; दिला निर्वाणीचा इशारा

मी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं... ! वैभव सूर्यवंशीने व्यक्त केल्या भावना; VVS Laxman अन् इशान किशन यांच्याबद्दल म्हणाला...

Chef Kunal's Masoor Dal Pulao: रोजच्या जेवणाचा कंटाळा आला? मग शेफ कुणाल कपूरचा मसूर डाळ पुलाव एकदा करून पाहाच!

अनेकदा मागणी करूनही डिंपल कपाडियांनी राजेश खन्नांना घटस्फोट का दिला नाही? लिव्ह इन पार्टनरने सांगितलं खरं कारण

Commonwealth Games 2026 : पदकाच्या अपेक्षा घेऊन, तो ग्लास्गोत आला अन् पहिल्याच फेरीत बाद झाला; गुरिंदरवीर सिंगच्या Exit ने भारताला धक्का...

SCROLL FOR NEXT