Cannonballs
Cannonballs sakal
मराठवाडा

धारूर किल्ल्यातील दगडी तोफगोळे गायब

सकाळ वृत्तसेवा

किल्लेधारूर येथील महादुर्ग किल्ल्यातील पंधरा तोफगोळे चोरीस गेल्याचे निदर्शनास आले असून शिवप्रेमींमधून याबाबत संताप व्यक्त होत आहे.

किल्लेधारूर - येथील महादुर्ग किल्ल्यातील पंधरा तोफगोळे चोरीस गेल्याचे निदर्शनास आले असून शिवप्रेमींमधून याबाबत संताप व्यक्त होत आहे.

धारूर किल्ला इतिहासाची साक्ष देत आजही डोलाने उभा आहे. या किल्ल्यामध्ये सातत्याने शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने स्वच्छता अभियान राबवले जाते. शिवरायांच्या जयंतीचे औचित्य साधत विविध संघटनांनी स्वच्छता अभियान येथे राबविले. स्वच्छता अभियान राबवत असताना येथे एका खोलीत ठेवण्यात आलेले दगडी तोफ गोळे चोरीस गेल्याचे समोर आले असून चोरी कोणी केली? कधी केली हे अद्यापपर्यंत स्पष्ट झालेले नाही. सातत्याने या किल्ल्याकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष आहे. या ठिकाणी पुरातत्त्व विभागाकडून पहारेकऱ्याची देखील नेमणूक करण्यात आलेली नाही. किल्ल्यातून चोरी गेलेल्या तोफगोळ्यांमुळे येथील शिवप्रेमींमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. झालेल्या चोरीचा तात्काळ छडा लावा अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत. तसेच पुरातत्त्व विभागाने या ठिकाणी शिपायाची नेमणूक करावी अशी मागणी जोर धरत आहे.

दगडी तोफगोळे बंद खोलीमध्ये ठेवण्यात आले होते. तोफगोळे जागेवर नसल्याने चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे शिवप्रेमींमधून संताप व्यक्त केला जात आहे. तर पुरातत्त्व विभाग कायमच धारूरच्या ऐतिहासिक ठेवा असणाऱ्या किल्ल्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने पुरातत्त्व विभागाविषयी स्थानिकांमध्ये नाराजी दिसून येत आहे.

- अतुल शिनगारे, नागरिक.

या अगोदरही किल्ल्याच्या प्रवेशद्वाराचे कुलूप तोडले होते. आम्ही पोलिस ठाण्यात अर्जही दिला होता. याप्रकरणी देखील पोलिस प्रशासनाशी संपर्क करू. असे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. सध्या पहारेकरी वरिष्ठ कार्यालयाकडून कमी करण्यात आलेले आहेत. तरी वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क करून पहारेकरी लावण्याचा प्रयत्न करू.

- नितीन चारुटे, व्यवस्थापक, धारूर किल्ला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: उदयनराजेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी कराडमध्ये दाखल

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT