case Filed against BJP social media team 
मराठवाडा

Vidhan Sabha 2019 : भाजप सोशल मीडिया टीमविरुद्ध परळीत गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा

परळी वैजनाथ : विडा येथील कथित व्हायरल क्‍लिपप्रकरणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या वतीने वाल्मीक कराड यांनी शनिवारी रात्री उशिरा भाजप सोशल मीडिया टीमविरुद्ध फिर्याद देण्यात आली. त्यानुसार रविवारी (ता. 20) येथील शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात असताना शनिवारी (ता. 19) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्या गुरुवारी (ता. 17) विडा येथील प्रचारसभेत बोललेल्या वक्तव्याची व्हिडिओ क्‍लिप भाजपच्या सोशल मीडिया टीमकडून व्हायरल करण्यात आली. त्यामध्ये धनंजय मुंडे यांनी बोललेल्या मूळ वक्तव्याला एडिट करून प्रसारमाध्यमामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने पसरविले.

ही बाब मुंडे यांच्या निवडणुकीवर परिणाम करणारी असल्यामुळे याविरोधात तत्काळ गुन्हा नोंद करून कारवाई करावी, अशी तक्रार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वाल्मीक कराड यांनी केली. यानुसार रविवारी येथील शहर पोलिसांनी याप्रकरणी भाजप सोशल मीडिया टीमविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

America-Iran War: होर्मुजच्या सामुद्रधुनीत पुन्हा तणाव! २४ तासांत तीन तेल जहाजांवर हल्ले

SCROLL FOR NEXT