Udgir News 
मराठवाडा

उदगीरात तेवीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल, रोहिण्यात अडीच लाखांची चोरी

संतोष जोशी / उद्धव दुवे

उदगीर  (जि.लातूर) ः मुंबई येथून टेंपोमधून विनापरवाना उदगीरमध्ये प्रवेश करू पाहणाऱ्या टेंपोचालकासह बावीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई येथून आलेले नागरिक कोरोनाबाधित निघाल्याचे शनिवारी (ता.१६) जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर उदगीरच्या सीमेवर वाहनाची कडक तपासणी करण्यात येत आहे. नळेगाव मार्गावरील शासकीय विश्रामगृहाजवळ रविवारी (ता.१७) दुपारी २२ प्रवाशांना मुंबई येथून विनापरवाना घेऊन आलेला उदगीरमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या टेंपोचालकासह बावीस जणांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनापरवाना आलेल्या चैतन्य भोसले, संतोष गायकवाड, अतुल गायकवाड, अरविंद गायकवाड, हिरामण गायकवाड, सुनील गायकवाड, प्रदीप गायकवाड, महादेवी गायकवाड, दैवशाला गायकवाड, मनोज कारामुंगे, अमर कारामुंगे, द्रौपदी कारामुंगे, तेजस्विनी कारामुंगे, आरती कारामुंगे, गणेश कांबळे, विकास कारामुंगे, विनोद कारामुंगे, रमेश कांबळे, शीतल कांबळे, लक्ष्मण सूर्यवंशी, पूजा सूर्यवंशी, बंडू भताळे आणि टेंपोचालक संतोष तुकाराम गायकवाड यांच्याविरोधात साथीचे रोग प्रतिबंधित कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून या सर्वांची तपासणी करण्याकरिता शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.

लातूरात एक दिवसाचा जनता कर्फ्यू, रविवार ठरतोय शांततेचा दिवस

रोहिणातील किराणा दुकानात अडीच लाखांची चोरी
रोहिणा (जि.लातूर) ः रोहिणा (ता. चाकूर) येथील अक्षय किराणा दुकानात रविवारी (ता.१७) सकाळी सहाच्या दरम्यान अडीच लाखांची चोरी झाल्याची घटना घडली. चाकूर पोलिसांनी भगवान त्र्यंबक केंद्रे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली.
रोहिणा येथील भगवान केंद्रे यांच्या अक्षय किराणा दुकानात चोरट्यांनी शनिवारी (ता.१६) रात्री आठ ते रविवारी (ता.१७) सकाळी सहाच्या दरम्यान दुकानाच्या आतील बाजूचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. गल्ल्यातील एक लाख ७२ हजार रुपये व पँटच्या खिशातील ५० हजार रुपये असे एकूण दोन लाख २२ हजार रुपये नगदी व दारासमोर लावलेली मोटारसायकल जिची अंदाजे किंमत २० हजार असे एकूण दोन लाख ४२ हजार रुपयांची चोरी अज्ञात चोरट्यांनी केली आहे. केंद्रे यांच्या फिर्यादीवरून चाकूर पोलिसांनी रविवारी (ता.१७) गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी विद्यानंद काळे, पोलिस निरीक्षक जयवंत चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक तोटेवाड यांनी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा तपास श्री. तोटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर अंधोरीकर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

Latest Marathi News Live Update : मालेगाव मध्ये तापमान 38.2 अंशावर पोहचले

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

वय वाढण्याआधीच मानेवर रेषा दिसू लागल्यात? या टेक लाइन्स घालवण्यासाठी जाणून घ्या डॉक्टरांनी सांगितले ४ सोपे व्यायाम

SCROLL FOR NEXT