Admission Fee Sakal
मराठवाडा

प्रवेश फिच्या नावाखाली लुट करतांना पकडले

सिध्देश्वर विद्यालयाचे दोन शिक्षक पोलिसांच्या ताब्यात; पावणे दोन लाख रूपये जप्त

कमलेश जाब्रास

माजलगाव (जि. बीड) - सिध्देश्वर विद्यालयामध्ये प्रवेश घेण्याकरीता फिच्या नावाखाली लुट करत असल्याचा प्रकार उघडकीस आला असुन येथील वैष्णवी मंगल कार्यालयामध्ये आमदार प्रकाश सोळंके यांनी शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी व पोलिसांसह स्टिंग ऑपरेशन आज मंगळवारी (ता. 14) केले. यावेळी पालकांकडुन फिसच्या नावाखाली घेतेलेली एक लाख 76 हजार रूपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

शहरामध्ये सिध्देश्वर विद्यालयामध्ये शिक्षण संस्थेत अग्रगण्य संस्था म्हणुन ओळखली जाते. याठिकाणी प्रवेश मिळविण्यासाठी अनेक पालकांची धडपड असते. शाळा सुरू होण्याच्या कालावधीत प्रवेशासाठी पालकांची गर्दी होते तर फिसच्या नावाखाली लुट होत असल्याच्या तक्रारी सामाजिक कार्यकर्त्यांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालय व बीड शिक्षणाधिकारी कार्यालय यांचेकडे केलेल्या आहेत. मंगळवारी येथील वैष्णवी मंगल कार्यालयामध्ये प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावुन प्रवेशासाठी पालकांकडुन एका प्रवेशासाठी पंधरा ते विस हजार रूपये अशी फिस घेउन प्रवेश देण्यात येत होता.

याप्रकाराची तक्रार शिक्षणाधिकारी कुलकर्णी व आमदार सोळंके यांना देण्यात आली. यानंतर आमदार प्रकाश सोळंके व शिक्षणाधिकारी कुलकर्णी यांनी पोलिसांना सोबत घेत वैष्णवी मंगल कार्यालयात जात स्टिंग ऑपरेशन केले असता पालकांकडुन कर्मचा-यांमार्फत रोख रक्कम घेणे सुरू होते. यावेळी पोलिसांनी एक लाख 76 हजार रूपये रोख रक्कम जप्त केली आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: ‘माझी टिंगल करा, मला वाईट वाटणार नाही’; जरांगेंच्या टीकेला बावनकुळेंचा सडेतोड पलटवार, एकही दाखला रद्द केलेला नाही

Shirur Kasar Loan Waiver: चार हजार ५२१ शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा मार्ग झाला मोकळा; शिरूर कासार; कर्जमुक्तीची पहिल्या टप्प्याची यादी जाहीर; आधार प्रमाणीकरणाचे आवाहन

Beed Water Shortage:आष्टी शहरासाठी १९ टँकरच्या खेपा; आष्टीकरांचे डोळे आकाशाकडे; १५ ते २० दिवसांनी मिळतंय पाणी

Marathi News Live Updates : डी. के. शिवकुमार यांच्या सरकारमध्ये हिंमत असेल, तर त्यांनी RSS वर बंदी घालून दाखवावी; भाजप प्रदेशाध्यक्षांचं ऑपन चॅलेंज

August 2026 Horoscope: नोकरीत प्रमोशन, व्यवसायात नफा अन् उत्पन्नाचे नवे मार्ग; ऑगस्टमध्ये ‘या’ ४ राशींचे दिवस बदलणार

SCROLL FOR NEXT