Nanded Photo 
मराठवाडा

Video : सावधान...वजिराबाद चौरस्त्यावर अवतरला यम

शिवचरण वावळे

नांदेड : लॉकडाउन असतानाही नागरीक विनाकारण बहाणे करून रस्त्यावर येत असल्याने पोलिस यंत्रणेवर ताण वाढत आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात पहिला कोरोना रुग्ण सापडल्याने नागरिकांची सुरक्षा घेणारी यंत्रणा अधिकच हादरून गेली. मात्र, अनेकांना अद्यापही गांभीर्य नाही. यासाठी पोलिस विभागाने चक्क यमराजालाच बोलावले आहे. 

लॉकडाउनमध्ये कुणीही घराच्या बाहेर निघु नये, काहीदिवस तरी परीवारासोबत रहा अशी विनंती पोलिस हात जोडून करत आहे. परंतु, नागरिक काही ऐकण्याचे नाव घेत नाही. अनेकदा ऐकत नाहीत म्हणून पोलिसांना दंडुक्याचाही धाक दाखवला, तरीही लोकांना त्याचे गांभीर्य नाही. रस्त्यावर फिरणाऱ्यांमध्ये युवकच मोठ्या प्रमाणावर आहे. परिणामी, नागरिकांना धाक दाखविण्यासाठी पोलिस विभागाला आता नामी शक्कल लढवावी लागली आहे.  

जिल्हाप्रशासन व आरोग्य विभाग जागा 

‘कोरोना’चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महिनाभरापासून संपूर्ण देश लॉकडाउन करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्याच्या आजुबाजुस असलेल्या इतर जिल्ह्यात कोरोना संक्रमित रुग्ण आढळुन येत होते. परंतु मंगळवारपर्यंत (ता.२१ एप्रिल २०२०) जिल्ह्यात एकही ‘कोरोना’ संक्रमीत रुग्ण आढळुन आला नव्हता. मात्र, बुधवारी (ता.२२ एप्रिल २०२०) एक ६४ वर्षीय नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पोलिसांसह जिल्हाप्रशासन व आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. परिणामी शहरातील लॉकडाउन हा कडक करण्यात आला आहे. तरी ही नागरिक ऐकण्याच्या मनःस्थितीत नाही.   

‘हाऽऽऽ यम है हम’

त्यामुळे पोलिस विभागाने शुक्रवारी (ता.२४ एप्रिल २०२०) चक्क यमराजलाच रस्त्यावर उतरवले आहे.  ‘हाऽऽऽ यम है हम’ असे म्हणत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांच्या मानेवर ‘सुरा’ ठेवत ‘तु रस्त्यावर आला तर, मी तुझ्या घरी येणार’... असे म्हणत नागरिकांना घराबाहेरर पडु नका  असे आवाहन करत आहे. शिवाय घराबाहेर आलात तर याद राखा अशी भीती देखील नागरिकांमध्ये निर्माण करत आहे. वजिराबाद चौकात विनाकारण फिरणाऱ्यांना भर उन्हामध्ये मांडी घालून रस्त्यावरच बसवून ठेवले होते. एवढेच नाहीतर त्यांच्या हातात माईक देऊन त्यांना ‘कोरोनाचे स्लोगण’ वाचायला लावत होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT