file photo 
मराठवाडा

पतंगोत्सव साजरा करा पण...जरा जपून !

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : मकर संक्रात म्हणजे आनंदाचा आणि उत्साहाचा सण. हा सण जसा जवळ येऊ लागतो तसे बालगोपालांना आणि मोठ्यांनाही वेध लागतात ते पतंगाचे. रंगीबेरंगी, विविध आकारातील पतंग उडविणे हा एक वेगळाच आनंद असतो. मात्र या आनंदाच्या भरात आपण सुरक्षीततेकडे दुर्लक्ष करतो. पतंगोत्सव साजरा करताना उत्साहाच्या भरात निष्काळजीपणामुळे आपणास प्रसंगी जीव ही गमवावा लागू शकतो, याचे भान राहत नाही. त्यामुळेच पतंग उडविताना काही दुर्घटना होणार नाही याची सावधगिरी बाळगावी आणि सुरक्षिततेचे नियम पाळूनच पतंग उडवावेत असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात येत आहे.

पतंग उडविताना अपघात घडल्याच्या घटना बातम्यांच्या स्वरुपात आपण दरवर्षी वाचतो. शहरी भागात अपुऱ्या जागेअभावी घराच्या छतावर पतंग उडविताना अनेक जण आपल्याला दिसतात. पतंग उडविण्याच्या नादात आपल्या घरावरून गेलेल्या वीजतारांचाही विसर पडतो आणि खबरदारी न घेतल्यामुळे अपघातही होतो. त्याचबरोबर युवकांच्यात वीजतारांमध्ये अडकलेले पतंग काढण्याचीही जणू स्पर्धाच लागलेली असते. अशावेळी शॉक लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वीजतारांमध्ये अडकलेले पतंग काढण्याचा प्रयत्न करू नये.

खबरदारी घेवूनच पतंग उडवण्याचा आनंद घ्यावा


वीजतारांमध्ये अडकलेल्या पतंगाचा मांजा खाली जमिनीवर लोंबकळत असतो, हा मांजा ओढून पतंग काढण्याच्या प्रयत्नात एका तारेवर दुसऱ्या तारेचे घर्षण होवून शॉटसर्किट होण्याची शक्यता असते. त्यामुळे संबंधित परिसरात वीजपुरवठा खंडीत होण्याबरोबरच, त्या व्यक्तीचा शॉक लागून प्राणांकीत अपघात होण्याचाही धोका संभवतो. त्यामुळे संक्राती सारख्या आनंददायी सणाला गालबोट लागू नये याकरिता योग्य खबरदारी घेवूनच पतंग उडवण्याचा आनंद घ्यावा. त्यासाठी मोकळ्या जागेतच पतंग उडवावेत. पालकांनी दक्ष राहून मुलांना पतंग उडविण्यासाठी मार्गदर्शन करावे.

अडचणीच्या वेळी संपर्क क्रमांक


तातडीच्या मदतीची संभाव्य गरज लागल्यास, नजीकच्या महावितरणच्या कार्यालयाशी किंवा चोवीस तास सुरु असणाऱ्या कॉल सेंटरच्या १९१२, १८००-२३३-३४३५ आणि १८००-१०२-३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.

येथे क्लीक करापैसे आण, तरच ये...

धातूमिश्रित  मांजा  ठरू  शकतो  घातक


सध्या बाजारात धातूमिश्रित मांजा मिळतो. या मांजावर धातूमिश्रित रसायनाचे कोटिंग केलेले असते असा मांजा वीजेच्या तारेत अडकल्यास त्यामधून वीज प्रवाह पतंग उडविणाऱ्या व्यक्ती पर्यंत पोहचून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत काळजी घेऊन सर्वांनी सुरक्षितपणे पतंगोत्सव साजरा करावा.
दत्तात्रय पडळकर, मुख्य अभियंंता, नांदेड परिमंडळ.

हे लक्षात ठेवा…
ँ विजेच्या तारांवर अडकलेले पतंग काढणे जीवघेणे ठरू शकते.
ँ तारांमध्ये अडकलेला मांजा ओढू नये.
ँ वीजतारा असलेल्या परिसरात पतंग उडविणे टाळा.
ँ तारांत अडकलेली पतंग काढण्यासाठी दगडाला दोरा बांधून तारांवर फेकू नये.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

Eknath Shinde Reaction : ‘’मी जर पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता, तर..’’ ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा!

IND vs ENG 2nd Test: बॅट निसटली, विकेट गेली! Rishabh Pant च्या आक्रमणाला ब्रेक, मोडला ५९ वर्षांपूर्वीचा विक्रम, Viral Video

कसलं भारी! आईच्या वाढदिवसाला लेकीने आणला मालिकांचा केक; जन्मदात्रीचा आनंद गगनात मावेना, Video Viral

Ashadhi Wari: दिंडीत मोकाट जनावरांचा हल्ला; अनेकजण जखमी, चिमुकल्यांचाही समावेश

SCROLL FOR NEXT