मध्य रेल्वे sakal
मराठवाडा

Latur : विद्युतीकरणात मध्य रेल्वे विभागाची आघाडी

राज्यात साडेतीन हजार रुट किलोमीटरचे काम पूर्ण, लातूर-पांगरी प्रगतिपथावर

राजेश नागरे

लातूर : राज्यभरात रेल्वे मंत्रालयातर्फे विद्युतीकरणाचे काम वेगात सुरु असून मध्य रेल्वेने आघाडी घेतली आहे. आतापर्यंत साडेतीन हजार रुट किलोमीटर विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. लातूर ते पांगरी हे १३१ रुट किलोमीटर, नवीन झालेल्या अहमदनगर ते आष्टी मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण होताच मध्य रेल्वेचे राज्यभरातील हे काम पूर्ण होणार आहे. या सर्व मार्गांवरून गेली अनेक वर्षे सुरु असलेली डिझेलवरची रेल्वे बंद होणार आहे. बचतीसोबतच पर्यावरणाच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

देशभरात ठिकठिकाणी अनेक रेल्वे डिझेलवर धावत आहे. डिझेलच्या वाढत्या किमतीचा रेल्वेला फटका बसत आहे. त्यामुळे विद्युतीकरणावर भर दिला जात आहे. राज्यात मध्य, दक्षिण मध्य, पश्चिम, तसेच कोकण रेल्वेतर्फे ही कामे हाती घेण्यात आली आहेत. यात सर्वाधिक कामे मध्य रेल्वेकडे आहेत. मध्य रेल्वेने ती गतीने पूर्ण केली आहेत. आतापर्यंत राज्यात साडेतीन हजार रुट किलोमीटरचे विद्युतीकरण पूर्ण केले आहे. लातूर ते पांगरी (१३१ रुट किलोमीटर) आणि अहमदनगर - आष्टी (६६ रुट किलोमीटर) या मार्गांचा अपवाद सोडला तर राज्यात मध्य रेल्वेकडे असलेली सर्व मार्गावरील विद्युतीकरणाची कामे पूर्ण झाली आहेत. लातूर- पांगरी मार्गावरचे काम प्रगतिपथावर आहे. ही दोन कामे पूर्ण होताच राज्यभरातील मध्य रेल्वेच्या मार्गावरील गाड्या वीजेवरच्या असतील.

राज्यभरात मध्य रेल्वेकडून साडेतीन हजार रुट किलोमीटरचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. लातूर- पांगरी मार्गावरचे काम प्रगतिपथावर आहे. अहमदनगर- आष्टी मार्गाचे कामही लवकरच सुरु होईल. मार्चअखेरपर्यंत ही सर्व कामे पूर्ण होतील. कामे पूर्ण झालेल्या मार्गांवरून विजेवरील रेल्वे धावेल. यातून रेल्वे विभागाचे बचत होण्यासह प्रदूषणही टळणार आहे.

शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, मुंबई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: हैदराबादचा राजस्थानवर दणदणीत विजय! ईशान-अभिषेकच्या खेळीनं वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ; Points Table मध्ये उलथापालथ

Vaibhav Sooryavanshi: राजस्थान रॉयल्सला धक्का! वैभव शतकानंतर फिल्डिंग करताना लंगडत गेला मैदानातून बाहेर; नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi चे दुसरे शतक! तब्बल १२ षटकारांचा पाऊस पाडत IPL मध्ये ऐतिहासिक कारनामा; १९ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

Launch Service : मुळशी ते वाघवाडी प्रवासी लाँचसेवेचे लोकार्पण; १६ गावांतील ग्रामस्थांना होणार फायदा

SMT Heritage Scare: सीएसएमटी हेरिटेज स्थानकात ‘पॅरानॉर्मल’ कोड, गूढ चिन्हांनी खळबळ; काळी जादू, सुरक्षा आणि वारसा संरक्षणावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT