chakur chakur
मराठवाडा

लातूर - नांदेड महामार्गावर भाजपाचा दोन तास चक्का जाम

विविध मागण्याचे निवेदन तहसीलदार डाॅ. शिवानंद बिडवे यांना देण्यात आले.

प्रशांत शेटे

चाकूर (लातूर): ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहरातील लातूर - नांदेड महामार्गावर शनिवारी (ता.२६) तब्बल दोन तास चक्का जाम आंदोलन केले. यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी ओबीसीचे राजकीय आरक्षण कायम ठेवावे राज्य शासनाच्या नाकर्तेपणाच्या भूमिकेमुळे ओबीसी व मराठा आरक्षण रद्द होण्याची नामुष्की ओढवली आहे.

याचा निषेध नोंदवून आंदोलकांनी आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. सकाळी साडे दहा पासून साडे बारा वाजेपर्यंत हे आंदोलन चालल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, पोलिसांनी एसटी महामंडळाच्या बस बसस्थानकात थांबविल्या होत्या यामुळे प्रवाशांची तांराबळ उडाली. विविध मागण्याचे निवेदन तहसीलदार डाॅ. शिवानंद बिडवे यांना देण्यात आले.

या आंदोलनात भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विनायकराव पाटील, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, जिल्हा उपाध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर, वसंतराव डिगोळे, सभापती रोहीदास वाघमारे, जमुनाबाई बडे, नितीन रेड्डी, सज्जन लोणावळे, शिवाजी बैनगिरे, प्रशांत पाटील, अशोक चिंते, लता मुंडे, धनश्री अर्जुने, अॅड. संतोष माने, हाकानी सौदागर, प्रशांत बिबराळे आदी सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यात पुढील ५ दिवस हवामान बिघडणार! पुणे, नागपूरसह अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी; विभागाकडून सतर्कतेचं आवाहन

Pakistan Blast: पाकिस्तान पुन्हा हादरलं! शांतता रॅलीत भीषण स्फोट; १४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, नेमकं काय घडलं?

प्रश्न कमी, परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये; NEET PG 2026 चे नवे नियम जाहीर, 'या' 5 गोष्टी जाणून घ्या...

FDA थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करते? तुकाराम मुंढेंनी कारवाईमागचं नेमकं कारणच सांगितलं! जाणून घ्या कायदा...

Gangaapur Accident: गंगापूर फाट्याजवळ उभ्या ट्रकला आयशरची जोरदार धडक; २५ वर्षीय चालक गणी शेख जागीच ठार

SCROLL FOR NEXT