file photo
file photo 
मराठवाडा

मराठवाड्यात एक मार्चला पावसाची शक्यता

कैलास चव्हाण

परभणी : मराठवाडयात पुढील पाच दिवसात आकाश स्‍वच्‍छ राहुन ता.एक मार्च रोजी औरंगाबाद, जालना, बीड, उस्‍मानाबाद व नांदेड जिल्‍हयात तुरळक ठिकाणी अतिशय हलक्‍या स्‍वरूपाच्‍या पावसाची शक्‍यता आहे. अशी माहीती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाने दिली आहे.

सध्या मराठवाड्यात तापमान वाढण्यास सुरवात झाली आहे. मात्र, दोन दिवसांपासून सायंकाळच्यावेळी जोरदार वारे वाहु लागले आहेत. तसेच सोमवारी (ता.२४) काही भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी बहुतांष भागात थंडगार वारे वाहु लागले होते. त्यामुळे ढगाळ वातावरणाची स्थिती निर्माण होत असून त्याचा परिणाम म्हणून ता.एक मार्च रोजी औरंगाबाद, जालना, बीड, उस्‍मानाबाद व नांदेड जिल्‍हयात तुरळक ठिकाणी अतिशय हलक्‍या स्‍वरूपाच्‍या पावसाची शक्‍यता आहे. अशी माहीती ग्रामीण कृषि मौसम सेवा विभागाने दिली आहे.

गव्हावरील तांबेराचा असा करा बंदोबस्त
मराठवाड्यात उशिरा पेरणी केलेल्‍या गहु पिकात तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसुन आल्‍यास याच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी प्रोपीकोनॅझोल २५ टक्के ईसी १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वेळेवर पेरणी केलेल्‍या ज्‍वारीची काढणी शारिरीक पक्‍वतेच्‍या अवस्‍थेत करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणीच्‍या वेळी दाणे टणक होतात व दाण्‍यातील ओलावा २४-३० टक्के असतो. कणीस ताटापासून वेगळे करून मळणीयंत्राव्‍दारे ज्‍वारीची मळणी करावी.

हेही वाचा व पहा - Video: शेतकरी, नागरी समस्यांविरोधात भाजपचे जिल्हाभरात धरणे

पशुधनावर पिसवांचा प्रादुर्भाव
सध्या पशुधनावर तसेच इतर प्राण्‍यांवर पिसवांचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. यासाठी सर्वात महत्‍वाचे म्‍हणून पशुधनास इतरत्र हलवणे व त्‍यांना वनस्‍पतीजन्‍य किटकनाशकांची फवारणी (१५ मिली निंबोळी तेल + १५ मिली कारंज तेल + २ ग्रॅम अंगाचा साबण + १ लिटर पाणी) याप्रमाणात द्रावण करून फवारणी करावी. तसेच ज्‍या गोठयात पिसवांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्‍या गोठयाच्‍या भिंतीवरील भेगा, जाळे, जळमटे,इत्‍यादी स्‍वच्‍छ करून ४ टक्‍के मिठाचे द्रावण (४० ग्रॅम मीठ + १ लिटर पाणी) या प्रमाणात फवारावे.

हेही वाचा व पहा- Video: परभणीत १४ बटूंचा सामुदायिक व्रतबंध सोहळा

दुपारच्या तापमानात होणार वाढ
सध्या दुपारचे तापमान वाढण्यास सुरुवात झाली आहे.परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात ३० ते ३३ अंश दरम्याण असलेले तापमान येत्या पाच दिवसात ३८ अंशापर्यंत जाईल.अन्य जिल्ह्यात देखील तीन ते चार अंशानी तापमान वाढ होऊन ३४ ते ३५ अंशापर्यंत जाईल अशी शक्यता विद्यापीठाने वर्तवली आहे.
......

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT