मराठवाडा

'त्या' क्‍लिपमध्ये छेडछाड : डॉ. चोपडे

अतुल पाटील

औरंगाबाद : "माझ्या नावाने व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्‍लिपमध्ये छेडछाड केली आहे. हा मला ट्रॅप करण्याचा प्रयत्न दिसतोय. प्राथमिक चौकशीनंतर याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येईल.'' असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. बी. ए. चोपडे यांनी पत्रकार परिषदेत खुलासा केला. दरम्यान, क्‍लिपमधील वादग्रस्त वक्‍तव्यावर कुलगुरुंनी स्पष्टपणे बोलणे टाळले. 

डॉ. चोपडे म्हणाले, त्या क्‍लिपमध्ये आवाज माझा असला तरी ही घरातील चर्चा आहे. ती कुलगुरु म्हणून अधिकृत टिपण्णी नाही. कोणीतरी अनेक चर्चा एकत्रित करुन वाक्‍ये जोडली आहेत. हेतूपुरस्सर बदनामी करण्याचा हा कट आहे. पोलिस आयुक्‍तांशी याबाबत बोललो आहे. प्राथमिक चौकशी झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच यातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. आठवड्यानंतर प्रतिक्रिया देत असल्याच्या प्रश्नावर डॉ. चोपडेंनी कायदेशीर सल्ला घेऊन कार्यवाही करत असल्याने वेळ होत असल्याचे सांगितले.

पत्रकार परिषदेला प्र - कुलगुरु डॉ. अशोक तेजनकर, कुलसचिव डॉ. साधना पांडे, परीक्षा व मुल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. जयश्री सुर्यवंशी यांच्यासह अधिष्ठातांची उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीव दे म्हटलं म्हणून एखाद्याने खरंच जीवन संपवलं तर काय? हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Instagram Algorithm : इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल; ओरिजिनल कंटेंट होणार प्रमोट.. मात्र यूजर्सचं टेन्शन वाढणार!

Namrata Sambherao: "महाराष्ट्राची लाडकी नमा..."; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरनं नम्रता संभेरावला लिहिलं खास पत्र

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : कुर्ल्यातील भाभा हॉस्पिटलमध्ये कामबंद आंदोलन

SCROLL FOR NEXT