file photo 
मराठवाडा

कॉपीप्रकरणी अकरा केंद्रसंचालकांना डच्चू !

कैलास चव्हाण

परभणी : बारावी परीक्षेदरम्यान, जिल्ह्यात काही ठराविक केंद्रांवर कॉप्या अढळून येत असल्याने अशा चर्चेतील ११ केंद्रांवरील सध्या कार्यरत असलेल्या केंद्रसंचालकांना शिक्षण विभागाने डच्चू देत त्यांच्या जागी अन्य केंद्रसंचालकांच्या तातडीने नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

परभणी जिल्ह्यात बारावीच्या परीक्षांना प्रारंभ झाला आहे. या परीक्षेदरम्यान, सर्रास कॉप्या आढळून येत आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाच्या वतीने विविध पथकाद्वारे दररोज विविध केंद्रांना भेटी दिल्या जात आहेत. तरीही काही केंद्रांवरील प्रकार थांबायला तयार नसल्याने शिक्षण विभागाने मंगळवारी (ता. २५) मोठा निर्णय घेत थेट केंद्रसंचालकच बदलले आहेत. 

गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र
कॉपी रोखण्यासाठी उपाय म्हणून चर्चेतील केंद्रावरील केंद्रसंचालक व अन्य कर्मचारी बदलण्यात आले आहेत. त्यासाठी आदेश काढण्यात आले असून बदललेल्या केंद्रसंचालकांच्या जागेवर अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या तत्काळ नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या बाबत संबंधित तालुक्यांच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र देत सध्या कार्यरत केंद्रसंचालकांचा पदभार नव्याने नियुक्त केलेल्या केंद्रसंचालकांकडे देण्यात यावा, परीक्षेसाठी आवश्यक असलेली सर्व सामुग्री व केंद्रासाठी असलेली खर्चाची रक्कम त्यांच्याकडे हस्तांतरीत करावी यासह गटशिक्षणाधिकारी यांच्या परवानगीशिवाय परीक्षा केंद्रावर कोणीही उपस्थित राहणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वंदना वाहूळ यांनी दिल्या आहेत.


हेही वाचा व पहा - Video: परभणीत १४ बटूंचा सामुदायिक व्रतबंध सोहळा

येथील बदलले केंद्रसंचालक
जयभवानी उच्चमाध्यमिक विद्यालय मोजमाबाद तांडा (ता. पालम), संत गाडगेबाबा उच्चमाध्यमिक विद्यालय मार्तंडवाडी (ता. पालम), महात्मा फुले कनिष्ठ उखळी (ता. सोनपेठ), संस्कृती कनिष्ठ महाविद्यालय पूर्णा, ब्रम्हेश्वर कनिष्ठ महाविद्यालय बामणी (ता. जिंतूर), संत तुकाराम उच्च माध्यमिक विद्यालय धानोरा (ता. जिंतूर), मन्नाथ कनिष्ठ महाविद्यालय कारेगाव रोड परभणी, माऊली ज्ञानतीर्थ महाविद्यालय टाकळी (ता. परभणी), श्री नृसिंह कनिष्ठ महाविद्यालय लोहगाव (ता. परभणी), कै. रेखाजी नाईक कनिष्ठ महाविद्यालय मालेवाडी (ता. गंगाखेड), बालाजी उच्च माध्यमिक विद्यालय इसाद (ता. गंगाखेड) येथील केंद्रसंचालक बदलण्यात आले आहेत.


गैरप्रकार रोखण्यासाठी उपाय
कॉपीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी उपाय म्हणून ११ केंद्रांवरील केंद्रसंचालक बदलण्यात आले आहेत. त्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांना पुढील कार्यवाहीसाठी आदेश दिले आहेत.
-डॉ. वंदना वाहूळ, माध्यमिक शिक्षणाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lohagad Murder Case: ''प्रतिष्ठेसाठी सियाने केतनला ठार मारण्याचा प्लॅन केला'', पोलिस चौकशीत चेतनचा धक्कादायक दावा

Rishabh Pant: 'भाई, कन्फर्म! मी परत येतोय...' DC सोबतच्या ट्रेडनंतर रिषभचा फोन अक्षर पटेलने आधी उचलाच नव्हता अन् मग...

Government Recruitment: मोठी बातमी! आरोग्य विभागात लवकरच पदभरती; पदनिर्मितीचा जीआर निघाला, राज्यात एवढ्या जागा रिक्त

Pune City Yellow Alert : पुणे शहराला ‘यलो’ तर घाटमाथ्याला ‘ऑरेंज’ अलर्ट; पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार

Latest Marathi News Live Update: नसरापूर अत्याचार प्रकरणाचा उद्या निकाल

SCROLL FOR NEXT