जवखेडा : फळबागेतील झाडांना लगडलेले पेरू.  
मराठवाडा

पिकतंय; पण मनाजोगं विकत नाय... 

अरुण ठोंबरे

केदारखेडा (जि. जालना) -  भोकरदन तालुक्‍यातील केदारखेडा, जवखेडा ठोंबरे परिसरात अनेकांनी पारंपरिक पिकांना फाटा देत शेतीत प्रयोगशीलता जपली. फळबागांना पसंती दिली. मात्र बदलत्या हवामानाचा फटकाही फळबागांना बसत आहे. त्यातच मागणीही घटली आहे. परिणामी पिकतंय; पण विकत नाय अशी अवस्थाही अनेकांची झालेली आहे. 

केदारखेड्याच्या परिसराला गिरिजा-पूर्णा नदीचे वरदान लाभलेले आहे. नदीपात्रात पाणीसाठा चांगला असला की परिसराची भूजल पातळीही वाढते. त्यामुळे नदीकाठच्या गावांसह परिसरात अनेकांनी फळबागांची जोपासना केली. मात्र सततच्या दुष्काळामुळे अनेकांच्या फळबागा नामशेष झाल्या. दुष्काळात पदरचे पैसे खर्च करून, कर्ज काढून, उधारी-उसनवारी करून पैसे उभे करीत अनेकांनी फळबागांना टॅंकरचे पाणी दिले. त्यामुळे कशाबशा फळबागा तगल्या. मात्र आता बदलत्या हवामानाचा फळबागांना फटका बसत आहे.

जवखेडा ठोंबरे परिसरातील शेतकरी ज्ञानेश्‍वर ठोंबरे यांनी तीन ते चार एकर क्षेत्रावर पेरूची फळबाग जोपासली. गतवर्षी दुष्काळात टॅंकरने पाणी विकत घेऊन फळबाग जगवली. यंदा फळबागेत चांगल्यापैकी पेरू लगडले. प्रारंभी मागणीही चांगली राहिली. त्यामुळे भावही मिळाला. मात्र पाण्यासह फळबागेच्या जोपासनेसाठी केलेला खर्च पाहता फारसे काही हाती लागले नाही.

सध्याही फळबागेत पेरू लगडलेले आहेत. मात्र सतत येणारे आभाळ, धुके, थंडी यामुळे पेरूच्या फळांवरही परिणाम झाला. शिवाय मागणीही कमी झाली. त्यामुळे कमी भावात पेरूची विक्री त्यांना करावी लागत आहे. 

दुष्काळात विकतचे पाणी आणून फळबाग जगविली. यंदा बागेत फळे बऱ्यापैकी लगडली. सुरवातीला विक्रीही झाली. नंतर मात्र मागणीही घटली आणि भावही कमी मिळत आहे. मिळेल त्या भावात फळविक्री करावी लागत आहे. त्यातच बदलत्या वातावरणाचा फटका बसण्याची शक्‍यता वाटते. 
- ज्ञानेश्वर ठोंबरे, शेतकरी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained: 500 च्या जळलेल्या नोटा कुणाच्या होत्या? Justice Yashwant Varma Cash कांडाची पूर्ण Timeline

Mumbai High Court Order : जयगड बंदरातील आमिराती गॅसवाहू जहाजाबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय; साडेनऊ कोटी भरा, नाहीतर गॅस रिकामा करा!

Pune Tunnel: पुण्यात आणखी एक बोगदा! सुतारदरा ते पाषाण भुयारी मार्गासाठी लवकरच सल्लागार नियुक्त, महापालिकेचा मोठा प्लॅन

Latest Marathi News Live Update : पुण्यात वारजे कर्वेनगर भागात पडलेल्या प्रचंड खड्डे दुरुस्ती साठी मनसे तर्फे वारजे क्षेत्रीय प्रमुखांना तुकाराम मुंडे यांची प्रतिमा भेट

Gokul Election Update : 'गोकुळ'ची बहुचर्चित प्रारूप मतदार यादी जाहीर; 4,897 संस्थांना मतदानाचा हक्क, 'इतक्या' संस्थांना बसला फटका!

SCROLL FOR NEXT