beed
beed 
मराठवाडा

छावणी तपासणीत अडथळा, बोलविला पोलिस बंदोबस्त

सकाळवृत्तसेवा

बीड : शेतकऱ्यांचा पुळका दाखवत चारा छावण्यांसाठी ओरड करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांनी छावण्यांमधून जनावरांचे पोट भरण्यापेक्षा स्वत:चे खिसे भरण्याचेच नियोजन केल्याचे जिल्ह्यात समोर येत आहे. राज्यात सर्वाधिक ६०० चारा छावण्या असलेल्या जिल्ह्यात छावणी चालकांची पशुमालकांसोबत तर मुजोरी आहेच. पण, अगदी दंडाधिकारीय अधिकार असलेल्या उपविभागीय अधिकऱ्यांनाही या मुजोरीचा प्रत्यय आला. 

परिसरातील कोल्हारवाडीत छावणीवर शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांना चारा छावणी तपासणीपासून तब्बल तासभर रोखले. छावणी तपासणी होऊन काळंबेर उघड होऊ नये म्हणून विद्युत पुरवठाही खंडीत करण्यात आला. छावणी चालकाच्या या मुजोरीनंतर पोलिस बंदोबस्त बोलावून छावणीची तपासणी झाली असली तरी या मुजोरीवर कार्यवाही काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

जिल्ह्यातील चारा छावण्यांत चार लाखांवर जनावरे आहेत. कागदोपत्री काळंबेर करुन संख्या वाढविण्याचा प्रताप छावणी चालकांनी सुरु केला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडेय यांनी गुरुवारी पाच उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत सर्वाधिक चारा छावण्या असलेल्या बीड आणि आष्टी तालुक्यांत तपासणी लावली. उपविभागीय अधिकारी शोभा जाधव या कोल्हारवाडी येथील ‘मत्स्यगंधा’ सेवाभावी संस्थेमार्फत चालविली जात असलेल्या चारा छावणीच्या तपासणीला सायंकाळी पोचल्या. 
छावणी तपासल्यानंतर जनावरांची खरी संख्या समोर येर्ईल म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेसह इतरांनी उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांना तब्बल तासभर छावणी तपासण्यापासून रोखले. विशेष म्हणजे छावणीची तपासणी होऊ नये यासाठी तेथील विद्युत पुरवठा तोडण्यात आला. या संदर्भात उपविभागीय अधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांशी संपर्क साधल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे व रपोलिस उपअधिक्षकांसह मोठा फौजफाटा छावणीवर पाठविला. पोलिस बंदोबस्तात बॅटरी आणि मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात उशिरापर्यंत छावणीची तपासणी करण्यात आली. दंडाधिकारीय अधिकार असलेल्या अधिकाऱ्यांबाबत असा प्रकार घडत असताना प्रशासन आता काय, भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. 

रात्रीतून साडेसातशे जनावरे कमी होण्याचा चमत्कार
दरम्यान, तीन मार्चला कोल्हारवाडीत सुरु झालेल्या चारा छावणीतील जनावरांचा आकडा ता. ३० व ३१ मार्चला १६१२ वर पोचला. पण, ता. एक एप्रिल रोजी सकाळीच, अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी छावणीला भेट दिली आणि त्यादिवशी जनावरांची संख्या ८७१ इतकी नोंदविण्यात आली. रात्रीतून ७४१ जनावरे कमी होण्याचा चमत्कारही याच छावणीत घडला आहे. दरम्यान, जनावरे छावणीत आहेत कि फक्त नोंदवहीत असा प्रश्न असून याला पाठीशी घालणारी महसूल विभागातील साखळीही कार्यरत असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. विशेष म्हणजे, या एकट्या मत्सगंधा संस्थेला १५ चारा छावण्या मंजूर करण्यात आल्या आहेत. 

दुसरा चमत्कार : जनावरे आले कुठून
पशुगणनेनुसार बीड तालुक्यातील लहान मोठ्या जनावरांची संख्या एक लाख १६ हजार आहे. तर छावणीतील जनावरांचा आकडा एक लाख २७ हजार आहे. पशुधनापेक्षा छावणीतील जनावरांची संख्या १२ हजार आहे. त्यातच परिसरातील दुध उत्पादक गावांतील जनावरे शेतकऱ्यांनी स्वत:च्या दावणीलाच बांधलेली आहेत. तरीही असे आकडे फुगलेले आहेतच. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Raver Lok Sabha Constituency : बालेकिल्ल्यात भाजप उमेदवाराला मताधिक्याची महाजनांची ‘गॅरंटी’

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

SCROLL FOR NEXT