Jagdish Surbhaiye sakal
मराठवाडा

Usmanpura Crime : आचाऱ्याने संपविले जीवन; सुसाइड नोट सोशल मीडियावर व्हायरल, आमदारावर केले आरोप

उस्मानपुरा परिसरातील मिलिंदनगर भागातील आचाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी (ता. सहा) सायंकाळी घडला.

सकाळ वृत्तसेवा

उस्मानपुरा - परिसरातील मिलिंदनगर भागातील जगदीश खेमचंद सुरभैये (वय ४७) या आचाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी (ता. सहा) सायंकाळी घडला. सुरभैये यांनी आमदार नारायण कुचे व त्यांच्या भावाने धमकी दिल्याची लिहून ठेवलेली सुसाइड नोट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सुसाइड नोटची शहानिशा करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी दिली.

दरम्यान, याप्रकरणाशी आपला संबंध नसून या सुसाइड नोटची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आमदार कुचे यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेत केली आहे. तर याच प्रकरणात आमदार कुचे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी बदनापूरचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी पोलिस आयुक्तांकडे केली आहे. याप्रकरणी सविस्तर माहिती अशी, उस्मानपुरा, मिलिंदनगर भागात जगदीश सुरभैये आचारी होते. त्यांना तीन मुली, एक मुलगा, पत्नी आणि आई असा परिवार आहे. त्यांच्या दोन मुलींचा विवाह झालेला आहे.

मंगळवारी त्यांची पत्नी कामानिमित्त बाहेर गेलेली असताना जगदीश सुरभैये यांनी घरात गळफास घेत आत्महत्या केली. शाळेतून घरी परतल्यानंतर त्यांच्या मुलीच्या लक्षात हा प्रकार आला. जगदीश सुरभैये यांना घाटीत दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले.

दरम्यान, जगदीश सुरभैये यांच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर एक चिठ्ठी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. या चिठ्ठीमध्ये ‘मी जगदीश सुरभैये. मी २०१९ मध्ये जयभवानी बँकेतून दोन लाख रुपये कर्ज घेतले होते. मी संपूर्ण व्याज भरले आहे; पण आमदार नारायण कुचे आणि त्यांचा भाऊ देविदास कुचे मला धमकी देत आहेत, म्हणून मी आत्महत्या करीत आहे,’ असा उल्लेख आहे. तर याप्रकरणी सुरभैये यांच्या कुटुंबातील कोणाची अद्याप तक्रार आलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

सांबरेंकडून कारवाईची मागणी

याच प्रकरणी बदनापूरचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी बुधवारी (ता. आठ) सायंकाळी पोलिस आयुक्त पवार यांची भेट घेत निवेदन दिले. यामध्ये जगदीश सुरभैये यांच्या सुसाइड नोटमध्ये आमदार कुचे आणि त्यांचे भाऊ देविदास कुचे यांची नावे आहेत. सुरभैये यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हे दाखल करून तत्काळ अटक करावी अशी मागणी संतोष सांबरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली.

राजकीय द्वेषापोटी षड्‍यंत्र - आमदार कुचे

याप्रकरणी बदनापूर-अंबडचे आमदार नारायण कुचे यांनीही बुधवारी (ता. आठ) सायंकाळी छत्रपती संभाजीनगर शहराचे पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. यावेळी आमदार कुचे यांनी राजकीय द्वेषापोटी बदनामी करण्यासाठी कोणीतरी हे षड्‍यंत्र रचल्याचा आरोप केला.

ते म्हणाले, ‘आपला त्या व्यवहाराशी काहीही संबंध नाही. त्याच्याशी आपला संपर्क कधी आलेला नाही’, असे त्यांनी स्पष्ट केले. शिवाय या तथाकथित चिठ्ठीची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्याकडे केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: रस्ते आणि पुलांना नवी ओळख मिळणार! मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांची नावे बदलणार; पण कोणत्या? जाणून घ्या यादी...

Rohit Pawar: ''..तोपर्यंत मी शर्टचं वरचं बटण लावणार नाही'', विधानसभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

भाजपच नाही, सोनिया गांधींनीही शब्द दिला होता! २०२७ पूर्वी विदर्भ वेगळा होणार, विदर्भ राज्य आंदोलन समितीने व्यक्त केला विश्वास

आम्ही आमचं बाळ गमावलं... लोकप्रिय मराठी इन्फ्लूएन्सर कपलला धक्का; म्हणाले- ५ व्या महिन्यात समजलं की...

Meat And Fish Ban: मांस आणि माशांच्या खुल्या विक्रीवर बंदी! आता परवानगी असेल तरच दुकान चालणार; राज्य सरकारची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT