Crime News 
मराठवाडा

Chh. Sambhajinagar : तरुणीला मुंबईला नेवून अत्याचार करणाऱ्यास २० वर्षे सक्तमजुरी

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती संभाजीनगर : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला मुंबईला पळवून नेत तिच्यावर तब्बल महिनाभर अत्याचार करणाऱ्या नराधमाला २० वर्षे सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली ५५ हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी ठोठावली.

महेश भाउसाहेब दळवी (वय २०, रा. केकत जळगाव, डोणगाव ता. पैठण, ह. मु. चितेगाव ता. पैठण) असे आरोपीचे नाव आहे. प्रकरणात १५ वर्षीय पीडितेच्या वडीलांनी फिर्याद दिली होती. त्यानूसार, २६ ऑगस्ट २०१९ रोजी पीडिता ही पैसे घेवून घरातून निघून गेली होती.

प्रकरणात बिडकीन पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणाचा तपास सुरु असतांना पोलिसांनी पीडितेला मुंबई येथून ताब्यात घेतले.

पीडितेने दिलेल्या जबाबानुसार, घटनेच्या तीन महिन्यापूर्वी पीडिता व आरोपी यांची ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले होते. त्यानंतर २६ ऑगस्ट २०१९ रोजी पळून जावून लग्न करायचे आहे, म्हणून दोघे मुंबईला आले.

तिथे तरुणीला घाटकोपर येथे एका रुमवर ठेवले व लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर बळजबरी महिनाभर अत्याचार केला. पीडितेची माहिती मिळताच २८ सप्टेंबर २०१९ रोजी पोलिसांनी पीडितेला ताब्यात घेतले. न्यायालयात सहायक सरकारी लोकाभियोक्ता ज्ञानेश्वरी नागुला- डोली यांनी १० साक्षीदारांचे जबाब नोंदवले.

साक्षपुराव्यावरुन न्यायालयाने आरोपी महेश दळवी याला दोषी ठरवून पोक्सोच्या कलम ४ (२) अन्वये २० वर्षे सक्तमजुरी, २५ हजार रुपयांचा दंड, कलम ८ अन्वये तीन वर्षे सक्तमजुरी, ५ हजार रुपये दंड, भादंवी कलम ३७६ (२) अन्वये १० वर्षे सक्तमजुरी, २० हजार रुपये दंड, कलम ३६३ अन्वये तीन वर्षे सक्तमजुरी, ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

या प्रकरणात तपास अधिकारी तत्कालीन उपनिरीक्षक एस. एन. चव्हाण यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. पैरवी अधिकारी म्हणून पोलिस अंमलदार सनी खरात आणि महिला पोलिस शिपाई एस.जी. घुगे यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAKISTAN SEMIS SCENARIOS : न्यूझीलंड हरला, म्हणून पाकड्यांनी जास्त फडफडू नये! उपांत्य फेरीचं समीकरण पाहताच येईल चक्कर...

T20 WC, NZ vs ENG : इंग्लंडने बाजी मारली, पाकिस्तानच्या जीवात जीव आला! न्यूझीलंड पराभूत होऊनही पोहचू शकतात उपांत्य फेरीत

Reliance Group: अंबानींच्या सून राधिका मर्चंट पैठणमध्ये! तीन महिन्यात दुसरा दौरा; पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाला दिली भेट

Accident : सिंदखेड फाट्यावर दुचाकी चारचाकीची भीषण धडक; एक महिला ठार, एक जखमी

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT