NCP Chhagan Bhujbal  Esakal
मराठवाडा

Chhagan Bhujbal : बीडमध्ये रॅली होणं गरजेचं, कारण...; छगन भुजबळांचं १३ तारखेच्या मेळाव्यापूर्वी वक्तव्य

नांदेडमध्ये ७ जानेवारीला तर १३ जानेवारीला बीड येथे ओबीसी मेळावा होत आहे. दरम्यान या ओबीसी समाजाच्या महाएल्गार मेळाव्यासंदर्भात मंत्री छगन भुजबळ यांनी अपडेट दिली आहे.

रोहित कणसे

मराठा आरक्षणाचा मुद्दा मागील बऱ्याच दिवसांपासून राज्यात गाजत आहे. मराठ्यांना कुणबी प्रणाणपत्र देण्यात यावं यासाठी आंदोलने केली जात असतानाच ओबीस समाजाकडून महाएल्गार मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. नांदेडमध्ये ७ जानेवारीला तर १३ जानेवारीला बीड येथे ओबीसी मेळावा होत आहे. दरम्यान या ओबीसी समाजाच्या महाएल्गार मेळाव्यासंदर्भात मंत्री छगन भुजबळ यांनी अपडेट दिली आहे.

भुजबळ म्हणाले की, नांदेडला मी जाऊ शकणार नाही, आमचे इतर नेते ती रॅली पूर्ण करतील. १३ तारखेला मी बीडला जाणार आहे, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना देखील विनंती ते करत आहेत. जास्तीत जास्त लोक तिथं येतील असा प्रयत्न राहील असे भुजबळ म्हणाले. तसेच बीडला जे झालं ते अतिशय भयानक आहे, त्यामुळे तिथं रॅली होणं गरजेचं आहे म्हणून मी तिथं जाणार आहे, असेही भुजबळ म्हणाले.

ओबीसी संदर्भात एका याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. याबद्दल विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, एका बाजूने आम्हाला ओबीसीमध्येच आरक्षण पाहिजे म्हणून काही नेते ताकद लावत आहेत. तर दुसरीकडे सर्व ओबीसीच्या बाहेर काढा, कारण ते कायदेशीर झालं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. यासाठी त्यांनी याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्र सरकारने देखील प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. महात्मा फुले समता परिषदेकडून देखील आम्ही हस्तक्षेप करून केस लढणार आहोत असे भुजबळ म्हणाले.

राज्य मागासवर्ग आयोगाने अजूनही आपलं म्हणणं मांडलं नाही याबद्दल विचारले असता, भुजबळ म्हणाले की मी अॅडव्होकेट जनरल धिरेंद्र सराफ यांच्याशी बोललो, त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र सरकारतर्फे आणि ओबीसी आयोगातर्फेसुद्धा प्रतिज्ञापत्र दाखल झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT