Raju Shinde esakal
मराठवाडा

Raju Shinde : राजू शिंदेंच्या मनधरणीचे प्रयत्न निष्फळ? बैठकीनंतर शिंदेंनी नाराजी केली उघड; म्हणाले, 'तेच' आम्हाला ज्ञान शिकवत असतील तर...

राजू शिंदे यांचा रविवारी ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पक्ष प्रवेशापूर्वीच राजू शिंदे यांचे शहरात बॅनर झळकले आहेत. भाजप पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही त्यांनी राजीनामा दिला आहे.

संतोष कानडे

छत्रपती संभाजी नगरः भाजप नेते तथा छत्रपती संभाजी नगरचे माजी उपमहापौर राजू शिंदे हे भाजपचं कमळ सोडून ठाकरेंची मशाल हाती घेतील, असं जवळपास स्पष्ट झालं आहे. भाजप नेत्यांनी दिवसभर केलेल्या मनधरणीचा राजू शिंदेंवर काहीही परिणाम झालेला नाहीत. आपला निर्णय ठाम असल्याचं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलून अंतिम निर्णय घेणार असल्याचं म्हटलं आहे.

राजू शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटात जाऊ नये तर मुंबईला येऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यावी यासाठी रावसाहेब दानवे हे राजू शिंदे यांची मनधरणी करत होते. छत्रपती संभाजी नगरमधल्या विमानतळावरच्या बैठकीनंतर संभाजीनगरमध्ये आणखी एक बैठक संपन्न झाली. रावसाहेब दानवे, अतुल सावे आणि राजू शिंदे यांची बैठक झाल्यानंतर राजू शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

राजू शिंदे यांच्या मनधरणीचे प्रयत्न फेल ठरल्याचं दिसून येत आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील भूमिका ठरवणार असल्याचं शिंदे म्हणाले. जवळपास दोन ते अडीच तास राजू शिंदे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू होता. बैठकीत राजू शिंदे यांचा नाराजीच सूर कायमच असल्याचं दिसून आलंय.

दरम्यान, राजू शिंदे यांचा रविवारी ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पक्ष प्रवेशापूर्वीच राजू शिंदे यांचे शहरात बॅनर झळकले आहेत. भाजप पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही त्यांनी राजीनामा दिला आहे.

काय म्हणाले राजू शिंदे?

गेली अनेक वर्ष ज्या पक्षात राहिलो, परिवारात राहिलो.. परिवारात राहून इतका संघर्ष कुठे असतो का? इतका संघर्ष मी केला. कार्यकर्त्यांचं किंवा पदाधिकाऱ्यांचा म्हणणं ऐकून घ्यायचं नाही.. भाजपचं काम चांगलं असूनसुध्दा जर आम्हाला दुय्यम वागणूक दिली जात असेल आणि ज्यांच काम ग्राउंड लेव्हलला काहीच नाही.. तेच आम्हाला ज्ञान शिकवत असतील तर अशा लोकांचे काम करून फायदा काय? कुठपर्यंत आम्ही अशा लोकांचे ओझे वहायचे? असा सवाल राजू शिंदे यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची बीएमसी निवडणुकीत एन्ट्री? दोन्ही मुलींकडून वडिलांसोबत अर्ज दाखल; कोणत्या जागेवरून लढणार?

Marathi Weekly Tarot Horoscope: लक्ष्मी योगामुळे वृषभ, मिथुन, कर्कसह 5 राशींना मिळणार मोठा आर्थिक लाभ; वाचा साप्ताहिक टॅरो राशिभविष्य

Stock Market Holiday : NSE कडून 2026 साठी सुट्ट्यांची यादी जाहीर; 15 दिवस शेअर बाजार बंद! 1 जानेवारीला बाजार सुरू राहणार?

Municipal Election 2025 : युतीच्या बैठकीपासून आमदार मिटकरी वंचित; चर्चेतून डावलल्याने नाराजीचा सूर, पक्षाअंतर्गत गटबाजी समोर...

Latest Marathi News Live Update : सोलापूर मनपा प्रभाग ८ मध्ये ठाकरे गट आणि मनसे दरम्यान जोरदार शाब्दिक वाद

SCROLL FOR NEXT