Man Married With Stepmother sakal
मराठवाडा

Chhatrapati Sambhaji Nagar : लग्नाच्या आठ वर्षांनंतर म्हणाला ‘माझे दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे!’

या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित नोकरदार विवाहितेने बेडरुममध्ये फॅनला गळफास घेतला. ही घटना १३ मेरोजी जयभवानीनगर गल्ली क्र. ११ येथे घडली.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - पतीचे अनैतिक संबंध पत्नीला माहिती झाल्यानंतर पतीने ‘माझे दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे, तू मला अडचण होत आहे, तू स्वतः मर नाहीतर मी मारुन टाकेन’ असे म्हणत पत्नीला बेदम मारहाण केली. तसेच सासरची मंडळीही या ना त्या कारणावरुन विवाहितेला त्रास देत असत.

या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित नोकरदार विवाहितेने बेडरुममध्ये फॅनला गळफास घेतला. ही घटना १३ मेरोजी जयभवानीनगर गल्ली क्र. ११ येथे घडली. याप्रकरणी मृत विवाहितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन विवाहितेचा पती, सासरा, सासू व जाऊ अशा पाचजणांविरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला.

आरोपी पती विनोद विश्वनाथ काळे, दीर विजय काळे, जाऊ नर्मदा विजय काळे, सासरे विश्वनाथ काळे आणि सासू सुमनबाई विश्वनाथ काळे (रा. सर्व जयभवानीनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत, तर शुभांगी विनोद काळे (२६) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

यासंदर्भात मृत शुभांगी हिच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची मुलगी शुभांगीचा विवाह २०१५ साली विनोद काळेसोबत झाला होता. शुभांगी ही एकूलती एक मुलगी होती, त्यामुळे तिचा विवाह धुमधडाक्यात लावून दिला होता.लग्नानंतर शुभांगीला सुरवातीचे काही दिवस चांगले नांदविले, मात्र नंतर तिला सासरच्या मंडळींकडून त्रास होत होता.

अनेकवेळा शुभांगी हिच्या माहेरच्या मंडळींनी बैठका घेऊन जावयासह त्याच्या आईवडिलांना समजावले होते. शुभांगी ही उच्च शिक्षित होती, ती शहरातील एका हॉस्पीटलध्ये नोकरी करत असे.

दरम्यान तिचा पती रात्री उशिरापर्यंत कोणाशी तरी बोलत असल्याने तिने पतीला ही बाब विचारली असता, त्याने तिला मारहाण केली. घटनेच्या एक दोन दिवस अगोदरही तिला बेदम मारले होते. या सर्व बाबी दोन्ही घरी माहिती होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT