crime news 
मराठवाडा

Crime : 12वी पास आरोपीचा सायबर फ्रॉड करुन कोट्यावधींचा गंडा; आर.एल. स्टीलची फसवणूक

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : आर. एल. स्टील ॲण्ड एनर्जी या कंपनीच्या संचालकांच्या नावाचा बनावट मेल आयडी तयार करुन त्याद्वारे बॅंकेतून भामट्यांनी स्वतःच्या नावावर पैसे वळती करुन तब्बल ३६ लाख १२ हजार २८७ रुपयांचा गंडा घातला होता.

याप्रकरणी सायबर पोलिसांनी लखनौमधून एकाला अटक करुन आणले आहे. अजय रामनाथ सिंग (५०) असे त्याचे नाव असून त्याच्‍याकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी अजय हा लेबर कॉन्ट्रक्टर असून फ्रॉड करुन ऑनलाईन मिळविलेला पैसा हा लेबरच्या खात्यावर वळती केल्याची माहिती समोर आली आहे.

याप्रकरणा गुन्हा दाखल होताच याआधीच दोन आरोपीना अटक करण्यात आलेली आहे. मात्र हा आरोपी फरार होता. अखेर याचा पत्ता लागल्यानंतर सायबर पोलिसांनी रातोरात लखनौ गाठत याला अटक केली.

लेबरच्या नावे खाते काढून त्यावर मागवायचा पैसे

आरोपी याला १४ जून रोजी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने आरोपीला १९ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आरोपी अजय हा केवळ १२ वीपर्यंत शिकलेला असला तरी सायबर गुन्हेगारांच्या सावलीखाली वाढल्याने सायबर फ्रॉड करुन पैसे मिळविणे त्याला चांगलेच माहिती आहे.

पोलिस कोठडीदरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे, ती म्हणजे आरोपी अजय हा स्वतः लेबर कॉन्ट्रक्टर आहे. तो विविध ठिकाणी लेबर पुरविण्याचे काम करतो, इतकेच नव्हे तर लेबरच्या कागदपत्रांच्या आधारे राष्ट्रीयीकृत बॅंकांत मोठी रक्कम भरुन लेबरची चालू खाते (करंट अकाऊंट) उघडली आहेत.

लेबरच्या नावाने काढलेली बॅंक खात्याचा तपशील, एटीएम कार्ड, पासबुक, चेकबुक आदि साहित्य, दस्तावेज हा सदर लेबरला न देता आरोपी हा स्वतःकडे घेऊन ठेवत असे. आणि सायबर फसवणूक करताना समोरील व्यक्तीला लेबरच्या नावचे खाते क्रमांक देत असे. यामधून आजवर आरोपी अजय याने लाखो रुपये कमविले आहेत. हाच आकडा कोटींमध्ये जाण्याची शक्यता पोलिस सुत्रांनी वर्तविली आहे.

काय आहे प्रकरण

आरोपींनी आर. एल. स्टील ॲण्ड एनर्जी कंपनीचे संचालक नितीन गुप्ता यांच्या नावाचा बनावट मेल आयडी तयार केला होता. एका आरोपीने आपणच गुप्ता असल्याचे भासवून कंपनीचे खाते असलेल्या सिडकोतील पंजाब नॅशनल बॅंकेच्या मॅनेजरला बनावट तयार केलेल्या मेलद्वारे तिघांचे बॅंक खाते क्रमांक देत त्याच्या खात्यावर कंपनीच्या खात्यातून ३६ लाख १२ हजार २८७ रुपये आरटीजीएसद्वारे पाठविण्याचे सांगितले.

त्यानुसार बॅंकेकडून चारही आरोपींच्या खात्यावर ऑनलाईन पैसे पाठविले. त्यानंतर २२ सप्टेंबर २०२१ रोजी हा प्रकार उघडकीस आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड! झिम्बाब्वेत सूर गवसला... ४ चौकार, ४ षटकारांसह अर्धशतक ठोकून गाजवले मैदान

Latest Marathi Update : ते घाबरले आहेत, म्हणूनच त्यांनी बॅरिकेड्स लावले - राजीव शुक्ला

IND U-19 vs SL U-19 : भारताचा श्रीलंकेवर 211 धावांनी दणदणीत विजय; युवा कसोटी मालिका 1-0 ने खिशात

Mumbai Rain: राज्यात पावसाचा कमबॅक! ४ दिवस अतिवृष्टीचा इशारा; मुंबई, पालघरसह 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट

Guru Purnima 2026: 28 की 29 जुलै? यंदा गुरुपौर्णिमा नेमकी कधी? उदयतिथीनुसार जाणून घ्या योग्य तारीख, तिथी आणि धार्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT