हलगरा (ता. निलंगा) - गावात टॅंकरचे पाणी आडात टाकल्यानंतर ग्रामस्थांची झुंबड उडत आहे. 
मराठवाडा

मुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावात पाण्याचे दुर्भिक्ष

दत्ता बोंडगे

औराद शहाजानी - जलयुक्त शिवारमधून जलसंधारणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या हलगरा (ता. निलंगा) गावातही पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. दुष्काळामुळे गावात घागरभर पाण्यासाठी ग्रामस्थांना तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागत आहे. टॅंकरचे पाणी आडातून शेंदून घेताना सर्वांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

दहा हजार लोकसंख्येच्या गावाला तेरणा नदीपात्रातून पाणी योजना असून ही योजना सात वर्षांपासून बंद आहे. सध्या गावातील ३६ पैकी केवळ दोन छोट्या टाक्‍यांतून पाणीपुरवठा सुरू आहे. २१ पैकी एका विंधन विहिरीला पाणी असून ही विंधन विहीर काही तास पाणी देते. अकरा हातपंप बंद असून आठ जुने बांधकाम केलेले आडही बंद पडल्याने गावाला पाण्याचा स्रोतच उरला नाही. यामुळे गावाला टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून एका टॅंकरचे पाणी तीन आडांमध्ये दर तीन दिवसाला टाकण्यात येत आहे. यामुळे आडातील पाणी शेंदून घेण्यासाठी ग्रामस्थांची झुंबड उडत आहे. जानेवारी महिन्यात गावासाठी चार बोअरचे अधिग्रहण आणि एका टॅंकरची मागणी करण्यात आली होती. यात मंजूर अधिग्रहणातील दोन बोअरचे पाणी आटले असून सध्या एका टॅंकरने सुरू असलेला पाणीपुरवठा कमी पडत आहे. 

यामुळे आणखी एका टॅंकरसह बोअरच्या अधिग्रहणाची मागणी केली असून त्यास अद्याप मान्यता मिळाली नसल्याचे उपसरपंच अमृत बसुदे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT