हिंगोलीच्या युवकाचे मुख्यमंत्र्याना निवेदन 
मराठवाडा

मुख्यमंत्री साहेब माझी जात कुठली; हिंगोलीच्या मराठा युवकाचे मुख्यमंत्र्याला निवेदन

तत्कालीन बीजेपी सरकारने एका समितीची नेमणुक केल्यानंतर घटनेत दुरुस्ती करुन आर्थिक निकषावर मराठा समजाला ईडब्लुएस मधून १६ टक्के आरक्षण दिले होते.

विठ्ठल देशमुख

सेनगाव ( जिल्हा हिंगोली ) : सध्या मराठा आरक्षणाची चर्चा रंगत असताना सेनगाव तालुक्यातील ताकतोडा गावातील एका तरुणाने मुख्यमंत्री साहेब मला माझी जात द्या, माझी जात कुठली अशा प्रकारचे निवेदन पाठवून राज्य सरकारचा निषेध केला.

तत्कालीन बीजेपी सरकारने एका समितीची नेमणुक केल्यानंतर घटनेत दुरुस्ती करुन आर्थिक निकषावर मराठा समजाला ईडब्लुएस मधून १६ टक्के आरक्षण दिले होते. मात्र ५० टक्क्याची मर्यादा ओलांडल्यामुळे या भूमिके विरोधात काहीनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे मराठा आरक्षणावर स्थगिती देण्यात आली. आणि संपूर्ण राज्यभरातून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात आला. राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी सुध्दा राज्य व केंद्र सरकारला मराठा आरक्षणा संदर्भात लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आवाहन केले होते.

हेही वाचा - सध्या पिकविम्याच्या मुद्द्यावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वाद वाढत असल्याचे दिसत आहे

सध्या मराठा आरक्षणाची चर्चा रंगत आहे. त्यामध्ये मी सुध्दा मराठा आहे. माझ्या शाळेच्या दाखल्यावरुन पण साहेब मला माझी आई संगीता पतंगे ह्या पूर्वी विदर्भातील संगीता गवळी आहेत. आणि माझे वडील मराठवाड्यातील म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील आहेत. आता आईची जात मालेगांव येथील तहसील कार्यालयामध्ये ओबीसी म्हणून आहे. आणि वडील हे मराठा सर्वसाधारण आहेत.

मग माझी जात कुठली, संविधानामध्ये स्त्री- पुरुष समानता आहे. तर माझी आई आणि वडील यांना समान हक्क मिळायला पाहिजे. आणि माझा जन्म दोघांच्या संमतीने झाला तर मग माझी जात कुठली, कारण मी मराठा आहे. तर माझी आई समान हक्कापासून दूर राहते. आणि म्हणावे तर वडील वेगळे राहतात. मग ह्या दोन्ही जाती वेगळ्या आहेत. तर त्यांना अंतरजातीय विवाह सिद्ध करा. असे निवेदन सेनगाव तालुक्यातील ताकतोडा गावातील मराठा युवक नामदेव लक्ष्मण पतंगे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT