file photo 
मराठवाडा

नांदेड जिल्ह्यात पुन्हा एका बालिकेवर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : पुरोगामी महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी आणखी एक घटना लोहा तालुक्यातील सोनखेड येथे बुधवारी (ता. २६) सकाळी उघडकीस आली. एका पाच वर्षीय बालिकेचे अपहरण करून तिला गावशेजारी असलेल्या नाल्यात नेऊन तिच्यावर अत्याचार केला.

पीडीत बालिकेला नग्नावस्थेत सोडून हा नराधम रात्रीच फरार झाला. आरोपीविरुद्ध अत्याचार व पोक्सोअंतर्गत सोनखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नराधम आरोपीच्या मुसक्या लवकरच आवळल्या जातील अशी माहिती पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी दिली.

लोहा तालुक्यातील सोनखेड येथील घटना

लोहा तालुक्यातील सोनखेड येथील एका पाच वर्षीय चिमुकली ही आपल्या अंगणात मंगळवारी (ता. २५) खेळत होती. यावेळी तिथे येऊन कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तिला खाऊचे आमिष दाखवून तिचे अपहरण केले. आपली बालिका कुठे गेली याचा शोध नातेवाईकांनी सर्वत्र घेतला. परंतु ती सापडली नाही. याप्रकरणी सोनखेड पोलिस ठाण्यात अज्ञातविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली भेट

बुधवारी नातेवाईक गाव परिसरातील नाले, ओढे विहीर आदी ठिकाणी तिचा शोध घेत असता ती एका नाल्यात बेशुध्दावस्थेत सापडली. लगेच सोनखेड पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ दखल घेत तिला नांदेडच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले. चिमुकलीला शोधून काढण्यात पोलिसांना यश आले मात्र तिच्यावर अत्याचार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेनंतर पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर, अतिरीक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांनी सोनखेड गाठले. या घटनेच्या निषेधार्थ सोनखेड कडकडीत बंद पाळण्यात आला. 

अपहरण करणारा तो अज्ञात आरोपी कोण​

चिमुकलीचं अपहरण करणारा तो अज्ञात आरोपी कोण याची माहिती पोलीस काढत असून लवकरच आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी सांगितले. पीडित चिमुकलीवर सध्या नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहितीही प्राप्त झाली आहे. दरम्यान या प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्याच्या मुसक्या तात्काळ आवळा अशी मागणी विविध सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Vaishali Darekar : उद्धव ठाकरेंना धक्का; एकनाथ शिंदेंना नडणाऱ्या 'वाघिणी'चा तडकाफडकी राजीनामा

Donald Trump Tariffs : डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणावरुन अमेरिकेत गदारोळ; २५ राज्यांचा सरकारविरोधात खटला

Supreme Court: ‘गुन्हेगारी पार्श्वभूमी’ म्हणजे केवळ गंभीर गुन्हे; सर्वोच्च न्यायालयाने यंत्रणेला सुनावले

Nitin Navin Statement : भाजप राष्ट्रीय अध्यक्षांचे नाक असलेल्या मतदारसंघातील पराभवानंतर नितीन नवीन यांची पहिलीच प्रतिक्रिया, 'निकालाचे गंभीर आत्मपरीक्षण करू'

Bombay High Court: ‘एफडीए’ला उच्च न्यायालयाचा पुन्हा दणका; नवी मुंबईतील रेस्टॉरंटच्या परवाना निलंबनाचे आदेश रद्द, बार मालकाला दिलासा

SCROLL FOR NEXT