Thane Crime  sakal
मराठवाडा

Sonpeth Crime : सोनपेठमधील शाळेत बालिकेवर अत्याचार

Sonpeth Crime : सोनपेठ शहरातील एका इंग्रजी शाळेत बालवाडीतील चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

सोनपेठ : सोनपेठ शहरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील बालवाडीतील चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सोनपेठ पोलिसात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

शहरातील एका नामांकित इंग्रजी शाळेत शिकणारी चिमुकली ता. ५ ऑक्टोबर रोजी शाळा संपल्यावर बोरखेड (ता. परळी) येथील तिच्या घरी गेली असता तिच्या अंगावर ओरखडे पाहून तिच्या आईने तिची विचारपूस केली.

यानंतर तिला दवाखान्यात दाखवले. यावेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले. या प्रकरणी सदरील चिमुकलीच्या पालकांनी सोनपेठ पोलिस ठाण्यात धाव घेत त्यांच्या बाजुच्या गावातीलच एका आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. याबाबत सोनपेठ पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अपर पोलिस अधीक्षक डॉ. यशवंत काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप टिपरसे, पोलिस निरीक्षक अशोक घोरबंड, पोलिस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड यांनी शाळेला भेट देऊन शाळेचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. शाळेने सर्व चोपन्न सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे दहा दिवसांचे फुटेज पोलिसांना दिले आहे. तपास पोलिस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड हे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Update: अजिंक्य रहाणेने सोडले KKR चे कर्णधारपद? व्हायरल पोस्टने उडवली खळबळ, त्यात लिहिलंय...

BAMU Recruitment: मराठवाडा विद्यापीठात ७८ पदांसाठी तब्बल ६,९१४ अर्ज; हार्डकॉपीसाठी १८ मार्चपर्यंत मुदत

Latest Marathi News Live Update : नवी मुंबईत घरगुती गॅस टंचाई

ISrael-Iran War : इराणचा तेल जहाजावर हल्ला, मुंबईच्या इंजिनिअरचा मृत्यू; समुद्रात उड्या मारल्याने २७ जण बचावले

Teacher Cyber Fraud Case : तुमच्या मोबाईलवरही असा व्हिडिओ कॉल येतोय? CBI अन् पोलिसांच्या नावाने निवृत्त शिक्षकाला घातला 59 लाखांचा गंडा, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT