photo 
मराठवाडा

मुलांच्या विकासासाठी बालसाहित्याची गरज : एकनाथ आव्हाड

गणेश पांडे

परभणी : मुलांच्या समतोल शारीरिक वाढीसाठी जशी सकस आरोग्यपूर्ण अन्नाची गरज असते. तशीच त्याच्या भावनिक, मानसिक व बौद्धिक विकासासाठी उत्तम बालसाहित्याची गरज असते. त्यामुळे उत्तम बालसाहित्य मुलांच्या वाढण्यासाठी देणे हे पालकांचे, समाजाचे परमकर्तव्य आहे, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांनी मंगळवारी (ता. २४) केले.

अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे अंतर्गत जिल्हा शाखा परभणीच्या वतीने धर्मापुरी (ता. परभणी) येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठानमध्ये विभागीय बालकुमार साहित्य संमेलनाचे उद्‍घाटन झाले. या प्रसंगी संमेलनाध्यक्ष एकनाथ आव्हाड बोलत होते. साने गुरुजी साहित्य नगरीतील बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे व्यासपीठावर कवी प्रा. इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. या वेळी केंद्रीय कार्यकारिणी कार्यवाह मुकूंद तेलीचेरी, प्रा. केशव बा. वसेकर, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रशांत गौतम, शिवसांब सोनटक्के, प्रा. किरण सोनटक्के, उपशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, प्रा. दिनानाथ फुलवाडकर, स्वागताध्यक्ष शीतल किरण सोनटक्के यांची उपस्थिती होती.

‘संवाद साधताना पुस्तकांशी मैत्री करा’
या वेळी बोलताना श्री. आव्हाड म्हणाले, लहान मुलांना खूप प्रश्न पडतात. त्या मुलांच्या प्रश्नांची उत्तरे देणे गरजेचे आहे. खरे तर मोठ्यांनी मुलांच्या प्रश्नाचे उत्तर पाठवून द्यायला हवं. तसेच साहित्यासाठी बाह्य अंगापेक्षा अंतरंग खूप महत्त्वाचे असते. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पुस्तकांशी मैत्री करा, नातं निर्माण करा, असं सांगत बालकविता सादर केल्या. या वेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्या कवितांना मोठा प्रतिसाद दिला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमात विभागीय बालकुमार साहित्य संमेलनाची स्मरणिका तसेच शीतल सोनटक्के लिखित 'त्याचं जग, तिचं जग’ व एकनाथ आव्हाड लिखित ' मिसाईल मॅन' या तीन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

हेही वाचा ऐरणीच्या देवा तुला... ​

पुस्तकांचे स्टॉल ठरले आकर्षण
या वेळी सभामंडप परिसर रांगोळीने सुंदर बनविला होता. परिसरात पुस्तकांचे स्टॉल लावण्यात आले होते. चित्रकार प्रज्वल ठाकर, आकांक्षा गरड व शिंदे या विद्यार्थ्यांचे चित्र प्रदर्शनही भरविण्यात आले होते. प्रास्ताविक परभणी शाखेचे अध्यक्ष शीतल किरण सोनटक्के यांनी केले. पाहुण्यांचा परिचय पल्लवी सूर्यवंशी यांनी करून दिला. सूत्रसंचालन त्र्यंबक वडसकर यांनी केले. विशाल मुरकुंदे, वैष्णवी बरबडे, माणिक पुरी यांनी आभार मानले. संमेलन यशस्वितेसाठी बालकुमार साहित्य संस्था परभणीचे सर्व सदस्य व ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

हेही वाचाशेतकऱ्याचा मुलगा झाला न्यायाधीश

‘श्यामची आई’ पुस्तक पालकांसाठीच
संमेलनाचे उद्‍घाटक कवी इंद्रजित भालेराव बोलताना म्हणाले की, लहान मुलांसाठी लिहिणं सोपं नाही. साने गुरुजींनी लहान मुलांसाठी व मोठ्यांसाठी सुद्धा लेखन केलयं. ‘श्यामची आई’ हे पुस्तक आपण मुलांसाठी आवश्यक आहे, असं म्हणतो. परंतु, खऱ्या अर्थाने ‘श्यामची आई’ पुस्तक पालकांसाठीच आवश्यक आहे, असे ते म्हणाले. बालसाहित्याला जुनी परंपरा असून पहिले बालसाहित्य म्हणजे आईचे अंगाई गीत आहे, असे म्हणून त्यांनी साहित्य परंपरा सांगितली. त्यांनी अनेक बालगीते व कविता सादर केल्या.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahadev Munde Case: खळबळजनक! '‘महादेव मुंडे खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला वाल्मीकने संपवलं’', आकस्मिक मृत्यूचा बनाव

Latest Marathi News Updates: माझ्या स्तरावर मी गंभीर दखल घेतली आहे - राहुल नार्वेकर

Eleventh Admission : अकरावीच्या दुसऱ्या फेरीत राज्यातील दोन लाख ५१ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश

ENG vs IND,4th Test: रिषभ पंत मँचेस्टरमध्ये खेळणार की नाही? कोचने दिले फिटनेसबद्दल महत्त्वाचे अपडेट्स; बुमराहबद्दल म्हणाले...

Vidhan Bhavan Clash: वाद नेत्यांमध्ये, पण भिडले कट्टर कार्यकर्ते! पडळकरांचा मारहाण करणारा आणि आव्हाडांचा मारहाण झालेला कार्यकर्ता कोण?

SCROLL FOR NEXT