mgm.jpg 
मराठवाडा

सापडलेल्या पैशातून ग्रंथभेट

स्वप्निल गायकवाड


नांदेड ः ‘एमजीएम’ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ग्रंथालयातर्फे नांदेड येथील सुमन बालगृहातील विद्यार्थिनीस संस्कारक्षम पुस्तके भेट देण्यात आली. ‘एमजीएम’ महाविद्यालयातील परिसरात विद्यार्थ्यांना वेळोवेळी विद्यार्थ्यांचे हरवलेले पैसे सापडतात. अनेक प्रामाणिक विद्यार्थी आणि कर्मचारी सापडलेले असे पैसे ग्रंथपालाकडे सुपूर्द करतात. ग्रंथालयातर्फे हरवलेल्या पैशाविषयी महाविद्यालयाच्या नोटीस बोर्डवर सूचनाही लावण्यात येते. तसेच प्रार्थनेच्या वेळी माईकवरून कळविण्यात येते. अनेक वेळा सूचना लावूनही पैसे मागायला कुणीही येत नाही. अशी रक्कम ग्रंथालयात ग्रंथपालाकडे जमा राहाते. 


ग्रंथपालाकडे असे एकूण चार हजार रुपये जमा झाले होते. रामनगर, नांदेड येथील सुमन बालगृहात पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थिनी राहतात. त्यांना वाचनाची आवड लागावी आणि त्यांचा सर्वागिण विकास व्हावा म्हणून अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. गोविंद हंबर्डे यांनी या जमा झालेल्या पैशाची पुस्तके सुमन बालगृहास भेट देण्याची कल्पना महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. गीता लाठकर यांना कळविली आणि त्यांनी या उपक्रमास परवानगी दिली.

हेही वाचा - ​ ‘या’ विद्यापीठात ‘ऍन्टी रॅगिंग सेल’ कागदोपत्रीच ?
तेथील विद्यार्थिनींचा वयोगट लक्षात घेऊन ग्रंथपाल हंबर्डे यांनी ४० उत्कृष्ट पुस्तकांची निवड केली आणि स्वतःचे एक हजार रुपये टाकून पाच हजार रुपयांची पुस्तके विकत घेतली. यामध्ये पंचतंत्र, जातककथा, कल्पना चावला, एपीजे कलाम, सुनिता विल्येम, मलाला, उत्कृष्ट स्त्री आत्मकथने, नापास मुलांची गोष्ट, भारतरत्ने, आमचा बाप आणि आम्ही, आई समजून घेताना, अधिकारिणी, इंग्रजी कसे बोलावे, निबंध संग्रह, आरोग्य आणि आहार, बालसंस्कार, जगविख्यात स्त्रिया अशा अनेक पुस्तकांचा समावेश आहे.

‘क्वालिटीज’ तयार करणे शिक्षकांचे ध्येय
विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना शोधून त्यांचा विकास करणे अशी शिक्षणाची व्याख्या केली जाते. कोणत्याही शाळेमध्ये, कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना ओळखून प्रोत्साहन देण्यास प्राधान्यक्रम दिला पाहिजे. मात्र त्यासाठी शिक्षण कोणत्या माध्यमतून दिले जाते हे महत्त्वाचे नाही. पुढील स्पर्धात्मक जगासाठी आवश्यक असणाऱ्या ‘क्वालिटीज’ तयार करणे शिक्षकांचे ध्येय असते. त्यासाठी जागतिकीकरणात टिकण्याऱ्या भाषेतून शिक्षण देणे महत्वाचे आहे. त्यामुळे मुलांना ग्रंथ अभ्यास करवून देणे हाही तितकाच महत्वाचा भाग समजला जातो.


या वेळी रविवारी (ता. दोन) एका कार्यक्रमात सदर ग्रंथ सुमन बालगृहास भेट देण्यात आले. बालगृहाचे संचालक अनिल विठ्ठलराव दिनकर आणि तेथील विद्यार्थिनींनी ही भेट स्वीकारली. या वेळी ग्रंथपाल डॉ. हंबर्डे यांनी विद्यार्थ्यांनी काय वाचावे, कोणत्या पुस्तकात काय माहिती मिळेल, हेही सांगितले. कार्यक्रमासाठी प्रा. विनायक सीतापराव, ज्ञानेश्‍वर पावडे यांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Bharat Train Food : ‘वंदे भारत रेल्वे’त प्रवाशांना आता स्थानिक पदार्थ दिले जाणार ; रेल्वेमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Messi and Revanth Reddy Football Video : लिओनेल मेस्सीने हैदराबादेत मुख्यमंत्री रेवंत रेड्डींसोबत खेळला फुटबॉल; हजारो चाहत्यांचा उत्साह शिगेला!

PMC Retired Employees : निवृत्तीनंतर दिलासा; २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा मोफत वैद्यकीय उपचार!

Pune Health : कर्करोग निदानासाठी पुणेकरांना मोठा दिलासा; महापालिकेचे पेट स्कॅन सेंटर सुरू; खासगी रुग्णालयांपेक्षा निम्म्या खर्चात!

Soybean MSP : आधारभूत किमत खरेदीत शेतकऱ्यांवर अन्याय नको; आमदार डॉ. संजय कुटे यांनी अधिवेशनात मांडली ठाम भूमिका!

SCROLL FOR NEXT