केदारखेडा : कोरोनामुळे शेतशिवारात खेळण्यात रमलेली मुले.  
मराठवाडा

बच्चेकंपनीचे खेळताना सोशल डिस्टन्सिंग 

अरुण ठोंबरे

केदारखेडा (जि. जालना), ता. २८ : कोरोनामुळे सध्या सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. ग्रामीण भागातील शाळेला सुट्या दिलेल्या आहेत. कोरोनाबाबत होणाऱ्या जागृतीमुळे मुलेही घराबाहेर जाऊ नयेत याची काळजी पालक घेताना दिसत आहेत. शेतशिवारातील मुलेही खेळताना सोशल डिस्टन्सिंग ठेवताना दिसत आहेत. 

ग्रामीण भागात शहरातून येणाऱ्यांबाबत धास्ती घेतली जात आहे. परिणामी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अनेक ग्रामस्थांनी गावाऐवजी शेतात राहणे सुरू केले आहे.

हेही वाचा :  कोल्हापूरहून आलेल्या ऊसतोड मजूरांची तपासणी

शाळेला सुट्या असल्याने मुलांनी गावात इकडेतिकडे फिरू नये याबाबत अनेक सुज्ञ पालक लक्ष देत आहेत. एकमेकांपासून अंतर ठेवा, खोकताना, शिंकताना तोंडावर रुमाल असू द्या, गर्दी नको अशा सूचनाही दिल्या जात आहेत. त्यामुळे मुलेही खेळताना याबाबत दक्षता घेत आहेत. 

शेतात रमताहेत मुले 

कोरोनामुळे सध्या शेतकरीही सकाळपासून आपल्या पाल्याला सोबत घेऊन शेतात जात आहेत. त्यामुळे लहान मुले शेतात रमताना दिसत आहेत. आखाड्यासमोर, झाडाखाली खेळत आहेत. मुली भातुकली, खेळभांडी खेळण्यात मग्न होत आहेत. काड्या, छोटे टिपरू यांच्या साहाय्याने घर तयार करण्यातही अनेकजण आनंद मानत आहेत. 

कष्टकऱ्यांची मुले अनभिज्ञ 

वीटभट्टी कामगार, ऊसतोड कामगार, बिगारी मजूर, कष्टकऱ्यांची कामे बंद झाल्याने रोजीरोटीचा प्रश्‍न आहे. अनेक वीटभट्टी कामगार, बिगारी मजूर परिसरातील शेतात मिळतील ती कामे करीत आहेत. कष्टकऱ्यांची मुले मात्र कोरोनाबाबत अनभिज्ञ आहेत. ही मुले सध्या वीटभट्टी, झोपड्यांसमोर खेळताना दिसतात. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained: 500 च्या जळलेल्या नोटा कुणाच्या होत्या? Justice Yashwant Varma Cash कांडाची पूर्ण Timeline

Mumbai High Court Order : जयगड बंदरातील आमिराती गॅसवाहू जहाजाबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय; साडेनऊ कोटी भरा, नाहीतर गॅस रिकामा करा!

Pune Tunnel: पुण्यात आणखी एक बोगदा! सुतारदरा ते पाषाण भुयारी मार्गासाठी लवकरच सल्लागार नियुक्त, महापालिकेचा मोठा प्लॅन

Latest Marathi News Live Update : पुण्यात वारजे कर्वेनगर भागात पडलेल्या प्रचंड खड्डे दुरुस्ती साठी मनसे तर्फे वारजे क्षेत्रीय प्रमुखांना तुकाराम मुंडे यांची प्रतिमा भेट

Gokul Election Update : 'गोकुळ'ची बहुचर्चित प्रारूप मतदार यादी जाहीर; 4,897 संस्थांना मतदानाचा हक्क, 'इतक्या' संस्थांना बसला फटका!

SCROLL FOR NEXT