Parbhani News 
मराठवाडा

Video - उरुसात बच्चेकंपनीची धमाल...

सकाळ वृत्तसेवा

परभणी : राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असलेला परभणीतील उरुसाला शनिवार (ता. एक) पासून सुरवात झाली. सर्कस, गगनचुंबी आकाशपाळणे, चक्री पाळणे, टोराटोरा, ड्रॅगन रेल्वे, जादूचे प्रयोग, मौत का कुँवा आणि नवीन आलेले टॉवरमध्ये बसण्याची मजा बच्चेकंपनी घेत असून खरेदीसाठी आलेल्या महिलांनी मीना बाजारही फुलला आहे.

परभणीत शेकडो वर्षांची पंरपरा असेलल्या सय्यद शाह तुराबुल हक यांचा उरूस सुरू झाला आहे. १५ दिवस चालणाऱ्या या उरुसात परभणीसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक गर्दी करतात. तर देशभरातून विविध वस्तूंसह खाद्यपदार्थांचे विक्रेतेही यात सहभागी होत असल्याने देशभरात उरुसाची ओळख आहे. यंदाही दिल्ली, जयपूर, इंदोर येथून विविध विक्रेते परभणीत दाखल झाले आहेत. या उरुसाचे आकर्षण असलेल्या मीना बाजारही फुलला आहे. विविध प्रकारांच्या खेळणीचे दर्गासमोरील जागेत यंदा ५०० हून अधिक स्टॉल उभारण्यात आले आहेत. मोठ्या जागेत मीना बाजार उभारला असून संसारोपयोगी साहित्य, खेळणी आणि सौंदर्य प्रसाधनांची रेलचेल पाहायला मिळत आहे. सर्कस, गगनचुंबी आकाशपाळणे, चक्री पाळणे, टोराटोरा, ड्रॅगन रेल्वे, जादूचे प्रयोग, मौत का कुँवा आणि नवीन आलेले टॉवरमध्ये बसण्याची मजा बच्चेकंपनी घेत आहेत.

 दिल्लीचा प्रसिद्ध हलवा, पुरी, कचोरी दाखल
 येथील उरुसात दिल्ली येथील विक्रेते १९५५ पासून येतात. दिल्लीचा प्रसिद्ध हलवा, पुरी, कचोरी यांचा समावेश आहे. त्यासोबतच बनारसची मिठाई उरुसात दाखल झाली आहे. स्थानिक खाद्यपदार्थांचीदेखील रेलचेल पाहायाला मिळत आहे.
रविवार हा सुटीचा दिवस असल्याने या दिवशी नोकरदार वर्ग मोठ्या संख्येने बाहेर पडला होता. 

वाहतूक वळविली
उरुसामुळे नेहमीच्या दर्गा रोडची वाहतूक वळविली आहे. मोठ्या वाहनांना अलीकडेच थांब दिला असून दुचाकीदेखील काही अतंरापासून अन्य रस्त्याने सोडल्या जात आहेत. उरुसात जाण्यासाठी जुना पेडगाव रस्ता सोईचा असल्याने याच मार्गावरून सर्व वाहने वळविण्यात आले आहेत. याच मार्गावरून थेट उरुसात प्रवेश करता येतो. तसेच पादचारी या रस्त्याने येत नाहीत. त्यामुळे बस, आणि अन्य वाहने याच मार्गाने येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

America-Iran War: होर्मुजच्या सामुद्रधुनीत पुन्हा तणाव! २४ तासांत तीन तेल जहाजांवर हल्ले

SCROLL FOR NEXT