file photo 
मराठवाडा

Video : परभणीत महामानवास अभिवादन

गणेश पांडे

परभणी : ऐरवी भीमसैनिकांच्या अथांग सागराच्या माध्यमातून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले जाते. परंतू, यंदा कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करीत परभणीकरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आप-आपल्या घरात राहूनच अभिवादन केले. केवळ जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास निवडक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. परंतू, यंदा कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्याच बरोबर नागरिकांनी रस्त्यावर फिरू नये, यासाठी संचारबंदीदेखील लागू करण्यात आली आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील सार्वजनिक जयंती मंडळाच्यावतीने रविवारी (ता.१२) एक महत्वपूर्ण बैठक ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली होती. या बैठकीत यंदाची भीमजयंती आप - आपल्या घरी राहून साजरी करण्याचे ठरले होते. त्यानुसार नागरिकांनी मंगळवारी (ता.१४) शहरात कुठेही गर्दी न करता आप -आपल्या घरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. सकाळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी स्वता महामानवाच्या पुतळ्या जवळ येऊन पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी निवडक दोन ते तीन अधिकारीच उपस्थित होते. त्याच बरोबर जिल्हाधिकारी कार्यालयासह, पोलिस अधीक्षक कार्यालय, जिल्हा रुग्णालय, तहसिल कार्यालया बरोबर इतर शासकीय कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.


घरावर, बाल्कनीत ध्वजावंदन
शहरातील गौतम नगर परिसरातील नागरीकांची भीमजयंती म्हणजे मोठा उत्सवच असतो. परंतू यंदा प्रशासनाने दिलेल्या नियमाचे पालन करून नागरिकांनी आप - आपल्या घरावर, बाल्कनी व घराच्या दरवाज्यातून ध्वजावंदनाला उपस्थिती दर्शविली. त्यामुळे पूर्णपणे सोशल डिस्टसिंगचा वापर यावेळी करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT