10th and 12th exam pattern sakal
मराठवाडा

10th Board : दहावीचे प्रवेशपत्र बुधवारपासून मिळणार ; १० फेब्रुवारीपासून प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षेला सुरूवात

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉल तिकीट) विद्यार्थ्यांना बुधवारपासून (ता. ३१) माध्यमिक शाळांमध्ये मिळणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉल तिकीट) विद्यार्थ्यांना बुधवारपासून (ता. ३१) माध्यमिक शाळांमध्ये मिळणार आहेत. दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या शाळांमार्फत ही प्रवेशपत्र मिळणार आहेत, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव (पुणे) अनुराधा ओक यांनी दिली.

राज्य मंडळातर्फे माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच दहावीची बोर्डाची परीक्षा १ ते २६ मार्च दरम्यान होत आहे. तसेच, दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा १० फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या परीक्षेसाठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येत आहे.

सर्व माध्यमिक शाळांना मार्च २०२४ च्या परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर बुधवारपासून ‘स्कूल लॉगिन’मध्ये डाउनलोड करून घेण्याची सोय उपलब्ध होणार आहे. काही तांत्रिक अडचण उद्‌भवल्यास माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे आवाहन राज्य मंडळाने केले आहे.

प्रवेशपत्र घेताना…

दहावीच्या परीक्षेसाठी सर्व माध्यमिक शाळांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेशपत्रे प्रिंट करून द्यायची आहेत. प्रवेशपत्र ऑनलाइन पद्धतीने प्रिंट करून देताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेण्यात येऊ नये. संबंधित प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी.

तसेच, विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रामध्ये विषय, माध्यम बदल असतील, तर त्यांच्या दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्याव्यात. त्याचप्रमाणे प्रवेशपत्रावरील छायाचित्र, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव, जन्मतारीख, जन्मस्थळ या संदर्भातील दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी करून त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे पाठवावी, अशा सूचना आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSP Hike: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 पिकांच्या MSPमध्ये वाढ; गहू, हरभऱ्याला आता किती भाव?

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर सांगली जिल्हा बँकेच्या मैदानात; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘जयंत पाटलांचा बाप आला’च्या घोषणा

Gangapur Crime: गंगापूर-खुलताबादच्या शेतवस्त्यांवर चोरट्यांची दहशत; आमदार प्रशांत बंबांकडून रात्रीची गस्त वाढवण्याचे निर्देश

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

E-Peek Survey: दुष्काळाच्या संकटात 'ई-पीक'ची डोकेदुखी;शिरूर कासारमध्ये कचाट्यात शेतकरी; ९६ हजार गटांची नोंदणी रखडली, ओटीपी येईना

SCROLL FOR NEXT