Suicide
Suicide 
मराठवाडा

क्‍लासेसचालकाची आत्महत्या

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - सातारा परिसरातील एमपीएससी क्‍लासेसचालकाने रविवारी (ता. ११) मध्यरात्री राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (ता. १२) पहाटे उघडकीस आली. वैभव कोल्हाटकर (वय ५४, मूळ रा. नगर, ह.मु. सातारा परिसर) असे क्‍लासेसचालकाचे नाव आहे.  

पोलिसांनी दिलेली माहिती अशी - वैभव कोल्हाटकर यांच्या पत्नीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. एक वर्षापासून ते सातारा परिसरातील कासलीवाल मार्व्हल येथे तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये किरायाने राहत होते. ते एमपीएससीचे क्‍लास घेत होते. त्यांची मुलगी प्रणिती इयत्ता दहावीत शिक्षण घेते. दिवाळीनिमित्त मामाकडे पुणे येथे ता. सात नोव्हेंबरला वैभव कोल्हाटकर यांनी तिला सोडले. त्यानंतर ता. आठ नोव्हेंबरला त्यांचा मुलीशी शेवटचा संपर्क झाला होता. ता. अकरा नोव्हेंबरला मध्यरात्री वैभव कोल्हाटकर यांनी राहत्या घरी गळफास घेतला. घटनेची माहिती शेजाऱ्यांनी सातारा पोलिसांना दिली. दरम्यान, सहायक फौजदार नारायण बऱ्हाटे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. आतून दरवाजाला कडी असल्याने अग्निशामक दलाच्या जवानामार्फत दरवाजा उघडून त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती सातारा पोलिसांनी कोल्हाटकर यांच्या मुलीला दिली. यानंतर तिने सविस्तर जबाब पोलिस ठाण्यात दिला. या घटनेप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद सातारा पोलिस ठाण्यात करण्यात आली.

कुत्रे भुंकल्याने घटना उघडकीस
कोल्हाटकर यांच्या घरात दोन कुत्री होती. ते वारंवार भुंकत असल्याने शेजाऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी दरवाजा उघडताच आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. कोल्हाटकर यांच्या पत्नीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. तेव्हापासून ते मानसिक तणावात होते. त्यातूनच आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा कयास आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT