JALNA SAKAL
मराठवाडा

प्रसिद्ध राजुरेश्‍वर मंदिर परिसरात साफसफाई

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारी, गुरुवारपासून भाविकांना दर्शन सुविधा

सकाळ वृत्तसेवा

राजूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारी घेत जालना जिल्ह्याचे आराध्य दैवत असलेल्या राजुरेश्‍वर महागणपती मंदिर गुरुवारी (ता.सात) प्रदीर्घ कालावधीनंतर भाविकांसाठी खुले होणार आहे. दरम्यान, मंगळवारी (ता.पाच) मंदिर परिसरात साफसफाई करण्यात आली.

गेल्या कित्येक दिवसांपासून बंद असलेल्या राजुरेश्‍वर मंदिराची दारे भाविकांसाठी गुरुवारी खुली होत असली तरी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नियमावलीही संस्थान प्रशासनाने जाहीर केली आहे. यात गर्भवती, आजारी, साठ वर्षांवरील ज्येष्ठांना नागरिकांना मंदिरात प्रवेश असणार नाही. याशिवाय कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्या भाविकांना प्रवेशासाठी प्राधान्य दिले जाणार आहे.

मंदिराच्या परिसरात भाविकांना मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आलेला आहे. विनामास्क आढळणाऱ्या व्यक्तींना दोनशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे. मंदिर परिसरात थुंकण्यासही सक्त मनाई करण्यात आली आहे. डिस्टन्सिंगचेही पालन भाविकांना करावे लागणार आहे, असे संस्थानचे अध्यक्ष, अधीक्षकांनी कळविले आहे. दरम्यान, मंगळवारी मंदिर परिसराची संस्थानातर्फे साफसफाई करण्यात आली.

भाविकांसाठी नियमावली

  1. गर्भवती, आजारी, साठ वर्षांवरील ज्येष्ठांना नागरिकांना नसणार प्रवेश

  2. लसीकरण पूर्ण केलेल्यांना प्रवेश प्राधान्य

  3. मास्कचा वापर अनिवार्य

  4. मंदिर परिसरात थुंकण्यास सक्त मनाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ठाकरे बंधू एकटवले! ४ ऑक्टोबरला 'जनमोर्चा'ची घोषणा; नेमका मुद्दा काय?

Virat Kohli Retirement: २०२७ चा वर्ल्ड कप हा माझा भारतासाठी शेवटचा...; विराट कोहलीचे निवृत्तीचे संकेत, रोहित शर्माही म्हणाला की...

Amazon Great Indian Festival sale 2026: स्मार्टफोन्सवर ऑफरचा पाऊस; मिळणार भरघोस डिस्काउंट! पाहा कोणत्या फोनची किंमत किती?

Incognito मध्ये सर्च केल्यावर हिस्ट्री दिसत नाही; पण ‘या’ लोकांना तुमची माहिती कळू शकते

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात मनसे-ठाकरे गटाचा ४ ऑक्टोबरला संयुक्त मोर्चा

SCROLL FOR NEXT