Hingoli sakal
मराठवाडा

Hingoli : स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात

संरक्षणात्मक साहित्याविना गंगाखेड येथे सफाईचे काम; पालिकेचे दुर्लक्ष

प्रा. डॉ. अंकुश वाघमारे

गंगाखेड : गंगाखेड शहरातील स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्यामुळे परभणी येथील नागराळ प्रा. लिमिटेड कंपनी सोबत स्वच्छता कर्मचारी पुरविण्याचा करार झाला. त्यांच्याकडून स्वच्छता कर्मचाऱ्यास संरक्षणात्मक साहित्य पुरविली जात नसल्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. संरक्षणात्मक साहित्याविना त्यांनी घाणीत उतरून स्वच्छतेची कामे करावी लागत आहेत.

गंगाखेड नगरपालिकेच्या वतीने रोजंदारी स्वच्छता कर्मचारी पुरविण्यासाठी परभणी येथील नागराळ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सोबत नुकताच करार झाला. स्वच्छता निरीक्षक शिवाजी हजारे यांनी स्वच्छता निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यापासून शहरात स्वच्छता होण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, नागराळ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून रोजंदारी स्वच्छता कर्मचाऱ्यांना बूट व हँड ग्लोज देण्यात आले नाहीत. त्यामुळे रोजंदारी स्वच्छता कर्मचारी आपले आरोग्य धोक्यात घालून नाली सफाई करतात. यातून त्यांना आजार होण्याचा धोका बळावला आहे.

नाले सफाई करणारे कामगार गटार नाल्यात उतरून कोणत्याही सुविधांविना गाळ आणि कचरा काढत असल्याचे भयानक चित्र आहे. विशेष म्हणजे त्यांना हे काम विनामोजे हाताने करावे लागत असून, त्यांना कोणतेही सुरक्षाकवच देखील ठेकेदाराकडून देण्यात आलेले नाही.

काळजी घेणाऱ्यांची काळजी घेणार कोण?

स्वच्छता कर्मचाऱ्यांमुळेच साथीचे आजार टाळण्यास मदत होते. आपल्या आरोग्यासाठी ते पहाटेपासूनच स्वच्छता करतात. पण, आपली काळजी घेणाऱ्या या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी कोण घेणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पहाटेपासून कार्यरत होणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना संसर्गाचा धोका सर्वाधिक असतो. कारण, शहराच्या कानाकोपऱ्यातील लोकांनी टाकलेल्या उकिरड्यात ते काम करतात. संपूर्ण शहरातील कचरा संकलन करणे, रस्त्यातील उकिरडे उचलून वाहनात टाकून त्याची कचरा प्रकल्पापर्यंत विल्हेवाट लावणे एकूणच शहर स्वच्छ करण्याची जबाबदारी त्यांची आहे. मात्र, सुरक्षा साधनांशिवाय ते काम करीत असल्याने त्यांच्याच आरोग्याचा प्रश्‍न मोठा निर्माण झाला आहे.

नियम काय सांगतो?

स्वच्छता कर्मचाऱ्यांना सर्वात आधी हातमोजे, पावसाळ्यात रेनकोट, छत्री, साबण, गमबुट, मास्क, हेड कॅप, हिवाळ्यात स्वेटर आणि सॅनीटायझर देण्याची आवश्‍यकता आहे. प्रत्येक स्वच्छता कर्मचाऱ्याला सुरक्षा साधने देणे बंधनकारक आहे. मात्र, बहुतांश कर्मचाऱ्यांना ते बघायलादेखील मिळत नाहीत. सॅनीटायझरबाबत कोणतीही स्पष्टता नाही. गमबूटची मागणी तर जुनीच आहे.

रोजंदारी स्वच्छता कर्मचाऱ्यास साहित्य पुरविण्याची जबाबदारी नागराळ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची आहे. त्यांनी तत्काळ स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आरोग्य लक्षात घेऊन साहित्यांचा पुरवठा करावा.

- शिवाजी हजारे,स्वच्छता निरीक्षक, नगरपरिषद, गंगाखेड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT