lohara 
मराठवाडा

मुलांना नग्न करून मारहाण केल्याच्या निषेधार्थ लोहारामध्ये बंद

निळकंठ कांबळे

लोहारा (उस्मानाबाद) : वाकडी (ता. जामनेर, जि. जळगाव) येथील दोन दलित मुलांना नग्न करून केलेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ बुधवारी (ता. २०) मातंग समाजाच्या वतीने लोहारा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.

वाकडी येथे विहिरीत पोहण्याच्या कारणावरून मातंग समाजाच्या दोन मुलांना अमानुषपणे मारहाण करून त्यांनी नग्न धिंड काढण्यात आली. या घटनेचा शहरातील विविध संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

लहुजी शक्ती सेनेने लोहारा शहर बंदची हाक दिली होती. त्यानुसार बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापाऱ्यांनी शहर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. राज्यात दिवसेंदिवस दलितावरील अत्याच्यारांच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे दलितांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे. दलितांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी राज्य शासनाने कठोर उपायोजना कराव्यात, वाकडी येथील केलेले कृत्य मानवतेला काळीमा फासणारे आहे, अशा विकृत कृत्य करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करून कडक शासन करावे, अशी मागणी तहसील प्रशासनाला दिलेल्या निवेदनात केली आहे.

यावेळी दीपक रोडगे, रवी पवार, मारूती रोडगे, बालाजी कसबे, अभिजित सगट, श्याम रोडगे, श्रीपती सुरवसे, अक्षय रोडगे, सुशील रोडगे, संदीप रोडगे, लखन रोडगे, शिवराज कांबळे, बंडू वाघमारे, अमोल रोडगे, बाळू वाघमारे, लक्ष्मण सगट यांच्यासह लहुजी शक्ती सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Father Kills Son : सांगलीत मनोरुग्ण मुलाच्या डोक्यात बापाने घातला दगड; सततच्या त्रासाला कंटाळून केलं कृत्य, कासेगाव पोलिसांत गुन्‍हा

Hingoli News: तहानलेल्या वानरांसाठी पाण्याची सोय; हयातनगर येथील शेतकरी विजय पाटील यांचा पुढाकार

Beed News: पोस्ट ऑफिस आहे की जनरल स्टोअर?; पत्रे दुकानात अन् कर्मचारी सुस्त; नागरिक संतप्त, सेवेेचा लाभ मिळणार तरी कसा?

Beed News: ‘सीतेच्या न्हाणी’चे वैभव पडले अडगळीत; विकासाचा वनवास; किल्ले धारूरच्या ऐतिहासिक स्थळांची दुरवस्था वाढली

Mumbai : ईस्टर्न एक्सप्रेस वेवर डंपरची दुचाकीला धडक, घर बघायला गेलेल्या मामा भाच्याचा चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT