light
light 
मराठवाडा

बंद दिव्यांमुळे परभणीकरांना पथ शोधणे कठीण  

सकाळ वृत्तसेवा

परभणी ः शहरात मुख्य रस्त्यांसह वसाहतीमधील अनेक पथदिवे बंद असून हळूहळू शहर काळोखात बुडत चालले आहे. दुरुस्ती व देखभाल करणारी एजन्सी व अधिकारी यांचे साटेलोटे तर नाही ना? असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. अनेक वसाहतीत नोंद अंधार असून त्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण देखील वाढीस लागल्याचे चित्र आहे.

केंद्र शासनाच्या ईईएसएल या अंगिकृत उपक्रमातून शहर एलईडी दिव्यांनी उजळून निघालेले होते. शहरात जवळपास बारा हजारावर विविध क्षमतेचे एलईडी बसविल्याचे सांगण्यात येते. परंतू, आजच्या परिस्थितीला प्रमुख रस्त्यांसह विविध व्यवसायातील बंद पडलेले पथदिवे तात्काळ बदलणे ही एजन्सीचे जबाबदारी असताना पालिकेच्या काही अधिकाऱ्यांबरोबर हात मिळवणी करून ही एजन्सी पथदिवे बसविण्यास टाळाटाळ करीत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे अनेक वसाहतीत नोंद अंधार असून त्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण देखील वाढीस लागल्याचे चित्र आहे. 

मॉनिटरींग सिस्टीमची प्रतिक्षा 
शहरातील सर्व एलईडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सेंट्रल मॉनिटरिंग सिस्टिम देखील कार्यान्वित होणार होती. त्यामुळे रात्रीच्या वेळी अनावश्यक पथदिवे बंद करण्यासह त्याची क्षमता देखील कमी करण्याची या सिस्टीममध्ये सुविधा असल्याचे सांगण्यात येत होते. तसेच बंद झालेल्या दिव्यांची माहिती देखील मिळणार होती. परंतू, ही सिस्टिम दोन वर्षानंतरही बसलेली नाही. नागरिकांनी तक्रारी देऊनही दिवे चालू न करणे, कमी क्षमतेचे एलईडी बसवणे, परस्पर जास्त क्षमतेचे काढून कमी व्हॅटचे दिवे बसवणे, घरगुती वापरासाठी एलईडी देणे असेही प्रकार सुरू आहेत. पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी शासनानेच एजन्सी दिलेली आहे. परंतू, ही एजन्सी आता काही अधिकारी पदाधिकाऱ्यांच्या वरदहस्ताने वरचढ झाल्याचे चित्र आहे. 

रात्रंदिवस पथदिवे सुरू 
ऊर्जेची तसेच विद्युत देयकाची बचत व्हावी म्हणून शासनाचा हा उपक्रम आहे. परंतू, शहरात अनेक वसाहती, रस्ते असे आहेत की तेथे २४ तास हे पथदिवे सुरू असतात. परंतू, ते बंद करण्यासाठी पालिका कुठलीही हालचाल करीत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे विद्युत देयकात मोठी वाढ होणार आहे.

(संपादन ः राजन मंगरुळकर) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

SCROLL FOR NEXT