file photo 
मराठवाडा

किराणा दुकानातून गुटख्याचा साठा

गणेश पांडे

परभणी : वालूर (ता.सेलू, जि.परभणी) येथे दोन किराणा दुकानातून ८४ हजार ५५० रुपयांचा गुटख्याचा साठा अतिरिक्त पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने मंगळवारी (ता.तीन) रात्री बारा वाजण्याच्या सुमारास छापा मारून जप्त केला. या प्रकरणी दोन व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेवून सेलू पोलिसांच्या स्वाधिन केले आहे.

अतिरिक्त पोलिस अधीक्षकांचे विशेष पथक सेलू तालुक्यात गस्तीवर असतांना त्यांना वालूर येथील बसस्थानकाजवळ असणाऱ्या ममता किराणा ॲण्ड जनरल स्टोअर्स तसेच त्याच्या बाजूस असलेले हरिओम किराणा अश्या दोन दुकानात मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा असल्याची माहिती या पथकाला मिळाली होती. 
या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (ता.तीन) रात्री बारा वाजण्याच्या सुमारास या दोन्ही ठिकाणी छापा मारला. 


 ९७ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त
ममता किराणा दुकानात शेख अतिक शेख इरशाद (वय १९, रा. बालाजी गल्ली, वालूर) तर हरिओम किराणा दुकानात हरिश विजयकुमार रेवणवार (वय २८, रा. बालाजी गल्ली, वालूर) या दोघांकडे पोलिसांनी विचारपुस केली. त्यानंतर दोन्ही दुकांनाची झडती घेतली असता या दुकानात मोठ्या प्रमाणात गुटखा आढळून आला. ममता किराणा दुकानात १३ हजार रुपयांचा गोवा कंपनीचा गुटखा,  १ हजार ३०० रुपयांचा वजिर गुटखा तसेच गुटख्याच्या विक्रीतून जमा झालेले १२ हजार १३० रुपये रोख, १ हजार रुपयांचा मोबाईल हॅन्डसेट असा २७ हजार ४३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच हरिओम किराणा दुकानातून ७० हजार २५० रुपयांचा गोवा गुटखा जप्त करण्यात आला. या दोन्ही ठिकाणी मिळून ८४ हजार ५५० रुपयांचा गुटखा तसेच १२ हजार १३० रुपये रोख व १ हजार रुपयांचा मोबाईल असा ९७ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून सेलू पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.  ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक एच.जी.पांचाळ, सहायक पोलिस उपनिरीक्षक एच. एस. कच्छवे, पोलिस कर्मचारी जे. जे. रेड्डी, एस. व्ही. घनसावंत, श्री.कांदे, चालक श्री.चव्हाण, महिला पोलिस शिपाई पी. बी.भोरगे यांनी मिळून केली.

अक्षय भंडारी हा मुख्य सुत्रधार
वालूर येथे दोन्ही दुकानात गुटख्याचा माल पोहचविणार अक्षय भंडारी नावाचा इसम आहे. तोच या दोन्ही दुकानात गुटख्याचा माल देत असे. त्याच्या सांगण्यावरूनच दोन्ही दुकानदारांनी गुटखाविक्री केली असल्याची माहिती दोन्ही दुकांनदारांनी पोलिसांना दिली आहे.

.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay: थलापती विजयच्या दारात सत्तेची ‘ऑफर’! भाजप म्हणते उपमुख्यमंत्री व्हा, पण विजयची नजर थेट मुख्यमंत्रिपदावर?

Cyber Crime: फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन विवाहीतेचा छळ; संग्रामपूरमध्ये धक्कादायक प्रकार

"आम्हाला आतातरी मूल नकोय" शुभविवाह फेम अभिनेत्रीचा खुलासा; कारण सांगताना म्हणाली..

फक्त 50 हजार रुपयांत स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च; खरेदीसाठी लागल्या रांगा, पाहा सर्व डिटेल्स एका क्लिकवर

Summer Health Tips: उन्हाळा आला…आरोग्याची काळजी घ्या! तब्येत सांभाळण्यासाठी काय खावं, काय टाळावं ते जाणून घ्या

SCROLL FOR NEXT