ajit pawar sakal
मराठवाडा

Ajit Pawar : भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचे झळकले बॅनर, सोबत मुंडे जयंत पाटलांचेही फोटो

साेशल मीडियावर चर्चेला उधाण

सकाळ वृत्तसेवा

परळी वैजनाथ - शहरातील तळ (नेहरु चौक) परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाने, अजित पवार भावी मुख्यमंत्री असा मजकूर असलेले बॅनर लावले. दरम्यान याची शहरात चर्चा होताच तासाभरात बॅनर काढण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात आपण पक्षाच्या अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त होणार अशी घोषणा केली. यामुळे राज्यात खळबळ उडाली. दरम्यान शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक जाबेरखान पठाण यांनी अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावले.

या बॅनरवर शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार धनंजय मुंडे, वाल्मीक कराड यांच्यासह माजी नगरसेवक जाबेरखान पठाण यांचे छायाचित्र होते. बॅनर लावताच याची सोशलमीडियावर चर्चा सुरू झाली. यामुळे तासाभराने बॅनर काढण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT