थंडीपासून बचावासाठी शाळकरी विद्यार्थी उबदार कपडे परिधान करत आहेत. 
मराठवाडा

परभणीत गुलाबी थंडी

सकाळ वृत्तसेवा

परभणी : मागील काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्याचे तापमान चांगलेच कमी होत असल्याने थंडीपासून बचावासाठी नागरिक उबदार कपडे परिधान करून लागले. अनेक भागात शेकोट्या पेटू लागल्या आहेत. दरम्यान, मागील काही दिवसांपासून तापमान १३ अंशावर स्थिरावल्याने परभणीकरांना गुलाबी थंडीचा अनुभव येत आहे.

यावर्षी डिसेंबर महिन्याच्या उत्तरार्धापासून थंडीला थंडीला सुरवात झाली. मागील आठवड्यात तपामानात मोठी घट झाली होती. मात्र, मध्यंतरी आकाशात ढग आल्याने पावसाचा अंदाज व्यक्त होत होता. परिणामी, वातावरणात मोठा बदल जाणवत होता. सकाळी थंडी, दुपारी गर्मी बरोबरच ढगाळ वातावरण तर रात्री पुन्हा काहीशी थंडी जाणवत होती. अशा वातावरणामुळे अनेकांना व्हायरलला सामोरे जावे लागले. लहान मुलांना छोट्या-मोठ्या आजारांचा सामना करावा लागला मात्र, मागील दोन दिवसांपासून पुन्हा थंडीचा जोर वाढला आहे. बोचऱ्या थंडीची जाणीव होत आहे. शनिवारी (ता.११) तापमान १३ अंश सेल्सीअस असल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिली.

उबदार कपडे खरेदीकडे मोर्चा
मागील काही दिवसांपासून थंडीची जाणीव होऊ लागल्याने अनेकांनी उबदार कपडे परिधान करणे सुरू केले आहे. त्याचबरोबर उबदार कपडे खरेदीकडे मोर्चा वळविला आहे. त्यामुळे पुन्हा एका गरम कपड्यांच्या दुकानांवर गर्दी वाढली असून स्वेटर विक्रेत्यांची चांदी होत आहे. सध्या बहूतांश जणांच्या अंगावर गरम कपडे दिसून येत असून सकाळी उशिरापर्यंत आणि सायंकाळपासून हे चित्र शहरात पाहवयास मिळत आहे. थंडीमुळे सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची संख्याही रोडावू लागली आहे. महत्त्वाचे म्हणजे या थंडीचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर झाला आहे. सर्दी, खोकला, तापीचे रूग्ण वाढत आहेत. सर्व रूग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढली आहे. विशेषतः डेंगी सदृश्य रुग्णांमध्ये अधिक वाढ झाली आहे. परतीच्या पावसाने सर्वत्र डासांची निर्मिती झाली होती. त्यामुळे डेंगी सदृश्य आजार आणि तापीच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून शहरात धूर फवारणी व आरोग्य जनजागृती केली जात आहे.

हेही वाचा-  राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत नागपुरची गोडबोले प्रथम ​

धुळीने नागरीकांना त्रास वाढला
जसी थंडी वाढत आहे तस तसी शहरात धुळीचे साम्राज्य देखील वाढले आहे. या धुळी मुळे नागरीकांना याचा मोठा त्रास होत आहे. रात्रीच्यावेळी धुळीचे प्रमाण वाढत असल्याने धुळीने नागरीक त्रस्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT