हिंगोली ः जिल्ह्यात मागच्या दोन दिवसांपासून थंडीचा जोर वाढला असून दिवसभर अंगात थंडी राहात असल्याने नागरिकांकडून स्वेटर व मफलरचा वापर वाढला आहे. तसेच हे वातावरण शेतीला व रब्बीतील हरभरा, गहु पिकांसाठी लाभदायक असल्याचे शेतकरी सांगत आहेत. थंडीचा जोर वाढल्याने जिल्ह्यातील जनजीवनावर परिणाम झाला आहे.
जिल्ह्यात मागच्या आठवड्यात दोन ते तीन दिवस सलग पावसाची रिमझीम सुरू होती. त्यांनतर मध्यंतरी ढगाळ वातावरण असे चित्र होते. ढगाळ वातावरणामुळे गारवा कमी झाला होता. त्यामुळे उष्णता देखील वाढली होती. आता दोन दिवसांपासून जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला आहे. शुक्रवारी (ता.११) सकाळी कमाल तापमान सोळा अंशावर होते. काही दिवसांपूर्वी कमाल तापमान अठरा अंशापर्यंत गेले होते.
हेही वाचा - ‘नाबार्ड’चा चार हजार आठशे कोटींचा आराखडा
थंडीमुळे उबदार कपड्यांना मागणी वाढली
सकाळी गारवा व दिवसभर थंडी कायम होती. अनेकांनी अंगातील स्वेटर, मफलर काढलेच नाहीत. वाढलेल्या थंडीमुळे उबदार कपड्यांना मागणी देखील वाढली होती. शहरातील गांधी चौकासह अकोला रस्त्यावर स्वेटर विक्रेत्यांनी दुकानाचे स्टॉल उभारले होते. थंडीमुळे दुकानातील उबदार कपड्यांची विक्री झाल्याचे विक्रेते सांगत आहेत. तर अनेक भागात सकाळ व सायंकाळच्या वेळी शेकोट्या पेटवून उब घेतली जात आहे.
हेही वाचा - ...अखेर विकास निधीचे नियोजन झाले
परतीच्या पावसाने मुबलक पाणी
वाढलेल्या थंडीमुळे रब्बीतील गहु व हरभरा या पिकांना देखील दिलासा मिळणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. जिल्ह्यात एक लाख ३१ हजार ५३ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे. यात गव्हाचे क्षेत्र २६ हजार ६२४ हेक्टर तर हरभरा पिकाचे पेरणी क्षेत्र ९२ हजार ६८४ हेक्टर ऐवढे आहे. वाढलेल्या थंडीमुळे मागच्या काही दिवसांपुर्वी झालेल्या धुक्यामुळे बुरशीजन्य व तांबेरा हा रोग पडला होता. मात्र, थंडीमुळे आता या पिकांना दिलासा मिळाला आहे. यावर्षी झालेल्या परतीच्या पावसाने सध्या विहिरी, बोअरवेल व शेततळ्यात देखील मुबलक पाणी असल्याने त्याचा उपयोग पिकांना देण्यासाठी केला जात असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
पिकांची वाढ होण्यास मदत होणार
सध्या दोन दिवसांपासून थंडीचा वाढलेला जोर रब्बीच्या पिकांसाठी आशादायक आहे. यामुळे पिकांची वाढ होण्यास मदत होणार आहे. मागच्या काही दिवसांपुर्वी पडलेल्या धुक्यामुळे पिकाच्या वाढीवर परिणाम झाला होता. आता पडत असलेल्या थंडीमुळे पिकांना चांगला फायदा होणार आहे.
-रमेश शेळके, शेतकरी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.