file photo 
मराठवाडा

सुखद : दिव्यांगांसाठी आयुक्त सरसावले 

नवनाथ येवले

नांदेड : सध्या कोरोना या विषाणुचा वाढत्या प्रभावामुळे नांदेड जिल्ह्यासह संपुर्ण देशात (लॉकडाऊन) संचारबंदी लागु करण्यात आली आहे. या लॉकडाऊनमुळे नांदेड शहर मनपा हद्दितील गरजु बेरोजगार दिव्यांगांवर उपासमारीची वेळ आली. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त सुनील लहाने यांनी तातडीची बैठक घेऊन अशोक सुर्यवंशी (प्रकल्प संचालक एनयुएलएम) यांची अशा गरजु दिव्यांगांना घरपोच जेवण देण्याकरिता समन्वयक अधिकारी म्हणून नेमणूक केली.

समन्वयक अधिकारी म्हणुन नेमणुक केल्याचे पत्र हाती मिळताच अशोक सुर्यंवशी यांनी ता. ११ एप्रिल पासुनच एनयुएलएमच्या पाच कर्मचार्यांची टिम आणि सहकार्यासाठी बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीतीचे अध्यक्ष राहुल साळवे आणि ऊपाध्यक्ष संजय धुलधाणी यांना सोबत घेऊन शहरातील विविध प्रभागात जाऊन गरजू दिव्यांगांना आठ दिवस जेवण नेऊन दिले. या दरम्यान रोज १३५ ते १४० गरजु दिव्यांगांना देण्यात येत असलेल्या जेवणासाठी पाच ते सहा तास रोज लागत होते. तसेच तापमान वाढल्यामुळे बनविलेले जेवणाचे डब्बे खराब होत होते. तसेच डब्बा देत असतांना काही सुदृढ व्यक्तीकडुन सोशल डिस्टंसींचा फज्जा उडविला जात होता. सदरील ही सर्व बाब आणि येणारी अडचण राहुल साळवे यांनी मनपा आयुक्त सुनील लहाणे यांना कळविले.

५७ दिव्यांगांना राशन किट अशोक सुर्यवंशी यांच्या टिमच्या माध्यमातुन घरपोच 

गरजु दिव्यांगांना घरपोच राशन किट द्यावी आणि आर्थिक अडचण असणाऱ्या तसेच यापुर्वी पाच टक्के निधीचा लाभ न घेणाऱ्या दिव्यांगांच्या खात्यावर पाच टक्के राखीव निधीतुन तत्काळ निधी वितरीत करावे अशी विनंती केली. आयुक्त सुनिल लहाणे यांनी तत्काळ दखल घेत मनपा हद्दीतील गरजु दिव्यांग ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही तसेच राशन कार्ड असुन आँनलाईन नसल्यामुळे राशन भेटत नसलेल्या विविध प्रभागातील ५७ दिव्यांगांना राशन किट अशोक सुर्यवंशी यांच्या टिमच्या माध्यमातुन घरपोच देण्यात आली. तसेच ज्या दिव्यांगांना आजवर मनपाकडुन राखीव निधीचा लाभ भेटला नाही.

संकट काळात महानगरपालिका आयुक्त दिव्यांगासाठी धावले

एकूण ९७ दिव्यांगांच्या थेट बँंक खात्यात (RTGS) डिबीटिद्वारे १५ हजार रूपये वैयक्तिक आणि २५ हजार रूपये व्यावसायीक अशा दोन प्रकारे निधी तत्काळ वितरीत करण्यात आला. या वितरणामध्ये २१ गरजु दिव्यांग लाभार्थ्यांना वैयक्तीक लाभ मागणीनुसार म्हणुन प्रत्येकी १५ हजार रूपये आणि ७६ गरजु दिव्यांगांना व्यावसायीक मागणीनुसार प्रत्येकी २५ हजार रूपये अशा प्रकारे एकुण तत्काळ २२ लाख १५ हजार रूपये खर्च करण्यात आला. संकट काळात महानगरपालिका आयुक्त. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Restaurant Fire : दिल्लीत रेस्टॉरंटमध्ये भीषण आग, २१ जणांचा होरपळून मृत्यू; आपचे माजी आमदार घटनास्थळी दाखल

Maratha Reservation: मृत आंदोलकांच्या वारसांना मोठा दिलासा! अंतरवाली सराटीतील आश्वासनाची पूर्तता; एमआयडीसीत नोकरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीचे आदेश

देशातील ३२ हजार टन सोन्यावर मोदी सरकारची नजर; १ टक्के जरी बाजारात आलं तरी टेन्शन मिटणार, नेमकी काय आहे योजना?

सासर असावं तर असं! सुनेची मालिका पाहण्यासाठी लावली थेट मोठी स्क्रीन, प्राजक्ता गायकवाड पोस्ट करत म्हणाली...

Mumbai News: मुंबईच्या जमिनीत पाणी जिरवण्याची क्षमता शून्य! रस्ते काँक्रीटीकरणाचा दुष्परिणाम, तीन दशकांत ६० टक्के जमीन सिमेंटखाली

SCROLL FOR NEXT