file photo 
मराठवाडा

विटेकरांनी जोपासली बांधिलकी; ग्रामीण रुग्णालयास दिली मदत

कृष्णा पिंगळे

सोनपेठ (जि.परभणी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश विटेकर यांनी ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर रविवारी (ता.२९) आपला वाढदिवस साजरा न करता सोनपेठ येथील आरोग्य सेवेसाठी मोठी आर्थिक मदत केली आहे.

त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन ही केले आहे. आपल्या मातोश्री तथा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई उत्तमराव विटेकर यांचे एक महिन्याचे मानधन व वैयक्तिक एकवन्न हजार रुपये देऊन विटेकरांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपला वाढदिवस साजरा न करता तालुक्यातील आरोग्य सेवेसाठी मोठी आर्थिक मदत तहसीलदार डॉ. आशिषकुमार बिरादार यांच्याकडे जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती निर्मलाताई विटेकर यांच्या हस्ते दिली. या वेळी तालुका आरोग्य समितीचे डॉ. सुभाष पवार व ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सिध्देश्वर हालगे, सुधीर बिंदू, गणेश पाटील, सुभाष सुरवसे, गजानन चिकणे यांच्यासह संदीप भोसले, कुलदिप भोसले हे उपस्थित होते.

हेही वाचा - एक महिन्याचे घरभाडे न घेण्याचे आदेश

रक्तदान शिबिराला प्रतिसाद
या पैशातून सोनपेठ तालुक्यातील आरोग्य सेवेसाठी आवश्यक त्या वस्तु उपलब्ध करण्याच्या सुचना त्यांनी या वेळी दिल्या. सोनपेठ येथील ग्रामीण रुग्णालयाची भव्य इमारत लवकरच सामान्य रुग्णांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. राजेश विटेकर यांच्या वाढदिवसानिमित्त २९ मार्च रोजी ग्रामीण रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. राज्यात पडलेल्या रक्ताच्या तुटवड्यामुळे जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहान तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

 वाळू उपसा करणाऱ्या टोळीला पकडले
पूर्णा (जि.परभणी) : धनगर टाकळी (ता.पूर्णा, जि.परभणी) येथील गोदापात्रातील वाळू उपसा करणाऱ्यावर पोलिसांनी शनिवारी (ता.२८) छापा मारून ३४ लाख ०९ हजार १०० रुपयाचा माल जप्त करत आकरा आरोपीवर चुडावा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनगर टाकळी जवळील गोदावरी पात्रातील बेकायदेशीररीत्या वाळू चोरून नेत असतांना सात टिप्पर, एक मोटार सायकल, पाच मोबाईल, नगदी १६०० रुपये असा एकूण ३४ लाख ९ हजार १०० रुपयांचा मुद्दे माल जप्त केला. अकरा आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा आरोपी फरार आहेत .
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे एअर ट्राफिक, हजारो उड्डाणे रद्द; जगभरातील विमानसेवेला फटका, विमानतळांवर प्रवाशांची गर्दी

Premnagarcha Maharaja: मुंबईत आगमनसोहळ्यात मोठी दुर्घटना, तातडीने गणेशमूर्तीचं विसर्जन, नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : मनोज जरांगे -पाटलांच्या उपोषणाचा आजचा बारावा दिवस, आतापर्यंत काय घडलं

Smart Meter Fire Uchgaon : उचगावमध्ये नवीन स्मार्ट मीटरने घेतला पेट; पहाटे घडलेल्या घटनेमुळे खळबळ, स्मार्ट मीटरच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह

मुख्यमंत्र्यांची मिमिक्री करणाऱ्याच्या मदतीने करायचा घोटाळे; भ्रष्टाचार, बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी बड्या अधिकाऱ्याला अटक

SCROLL FOR NEXT