yin.jpg
yin.jpg 
मराठवाडा

उत्साह, जल्लोष, गर्दी, तरुणाईचे जमले एकसामायिक समीकरण 

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद : "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' च्या (यिन) तीन दिवसीय समर युथ समिट 2018 च्या दुसऱ्या दिवशी तरुणाईचा उत्साह, प्रेरणा, जल्लोष, तरुणाईचे एकसामायिक समीकरण पहावयास मिळाले. मान्यवरांच्या करिअर, व्यक्तिमत्व विकास, नोकरीविषयक मागदर्शनाने तरुणाई चिंब झाली. 

आवड, क्षमता, पात्रता ही त्रिसुत्री महत्त्वाची ः पाटील 

आवड, क्षमता आणि पात्रता ही करिअरची खरी त्रिसुत्री असल्याचे सुनिल पाटील यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करुन "सकाळ' माध्यम समूहाने "यिन' चा चांगला उपक्रम राबवला. समाधान देणारे करिअर निवडा, ज्या कामात रस वाटेल तेच काम करा त्यातच खरे यश असते. काम करताना मुलभूत बदल होईल अशी जाणिव जेव्हा होईल तेव्हाच आपले काम सार्थकी लागले असे म्हणता येईल. पद, प्रतिष्ठा, किर्ती लाभते यशस्वि करिअरचे गमक आहे. करिअर निवडताना स्वतःला ओळखा, त्यात प्रामाणिक असणे हा खरा यशाकडे अधिक तीव्रतेने जाण्याचा मार्ग आहे, करिअर कशातही करा, पण त्यात आवड असली पाहिजे. मात्र हे करण्यासाठी सर्वप्रथम ध्येयनिश्‍चिती करा असा सल्लाही त्यांनी दिला. 
केवळ स्वप्न बघून चालनार नाही, त्या प्रत्यक्षात साकार करण्यासाठी जिद्द असायला हवी. स्वतःला ओळखा, मेहनत करा, जगाची भाषा इंग्रजीचे ज्ञान अवगत करा. स्वतःमधील क्षमता, कौशल्य वेळीच ओळखा. ज्या क्षेत्रात करिअर करणार आहात त्या क्षेत्रातील अर्थकारण समजून घेणे हे आजच्या युगात महत्त्वाचे आहे. नोकरी करणे वाईट नाही, परंतू नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणे शिका. 
 

स्पर्धा करण्यापेक्षा नाविण्याचा शोध घ्या : डॉ. रासकर 

स्पर्धेचे युग आता संपले आहे, स्पर्धा राहिलेली नाही. त्यामुळे एखाद्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी आता स्वतःला सिद्ध करावे लागणार आहे, त्यासाठी स्पर्धा करण्यापेक्षा नाविण्याचा शोध घ्या तेच खरे यशाचे गमक आहे, या शब्दात सृजन कॉलेज ऑफ डिझायनिंगचे डॉ. संतोष रासकर यांनी मार्गदर्शन केले. इतरांपेक्षा आपण वेगळे कसे आहोत हे दाखवून देण्यासाठी केवळ ज्ञान मिळवू नका तर मिळविलेल्या ज्ञानाचा वापर कुठे, कसा, कितपत करायचा हे समजले पाहिजे. जास्त मार्क मिळवून मार्कीस्ट होण्याऐवजी स्वयंअध्यन करा हीच खरी शिकण्याची सर्वोत्तम पद्धत असल्याचेही डॉ. रासकर म्हणाले. येणाऱ्या काळात लोकसंख्या, उद्योग वाढत आहेत, मात्र जीडीपीनुसारच नोकऱ्या उपलब्ध होतील. स्वतःमधील सृजनशीलता हरवू देऊ नका. शिक्षणविषयक दृष्टीकोन बदलण्याची गरज असून ती ताकद फक्त तरुणाईमध्येच आहे. आपण इतिहास वाचतो मात्र संदर्भ कधीच लक्षात ठेवत नाही. आजच्या युगात प्रत्येकजण फक्त स्वतःच्या गरजा भागविण्यासाठी जगत आहे, पैसा कमविणे ही माणसाची गरज नक्कीच आहे मात्र केवळ पैसा कमविणे हे आयुष्याचे सार नाही. त्यासाठी मानवी मुल्ये अंगिकरली पाहिजेत, हा ठेवा तरुणाई चांगल्या प्रकारे जपू शकते. 

अपडेट व्हा नाहीतर आऊटडेटेड व्हाल : अविनाश चाटे 

थांबला तो संपला या म्हणीप्रमाणे इंटरनेटच्या युगात मागे राहून चालनार नाही. त्यासाठी अपडेट व्हा नाहीतर आऊटडेटेड व्हाल असे अविनाश चाटे यांनी सांगितले. आजचा युवकांचा ध्येय निश्‍चीतीच जास्त वेळ जातो. संपूर्ण जग करत आहे, त्यात सर्वात चांगले काम करण्याचा प्रयत्न करा. तसेच असे काहीतरी करा त्यात खुप चांगले करण्याचीही गरज नाही. काही नवीन करत असाल तर भविष्यात नक्की काम मिळेल चांगला संवाद साधता येणं ही पहिली पायरी आहे. स्वतःला बदला तरच आपल्याला दुसऱ्या गोष्टीत बदल दिसेल. त्यासाठी स्वतःला गुंतवून घ्या. उद्याचा दिवस आपल्या हातात नसतो, म्हणून जे करायचे ते आजच करायला सुरवात करा. दुनिया जे करते त्यात आपण वेगळेपण आणायचा प्रयत्न करा. 

अपडेट व्हा नाहीतर आऊटडेटेड व्हाल : अविनाश चाटे 

थांबला तो संपला या म्हणीप्रमाणे इंटरनेटच्या युगात मागे राहून चालनार नाही. त्यासाठी अपडेट व्हा नाहीतर आऊटडेटेड व्हाल असे अविनाश चाटे यांनी सांगितले. आजचा युवकांचा ध्येय निश्‍चीतीच जास्त वेळ जातो. संपूर्ण जग करत आहे, त्यात सर्वात चांगले काम करण्याचा प्रयत्न करा. तसेच असे काहीतरी करा त्यात खुप चांगले करण्याचीही गरज नाही. काही नवीन करत असाल तर भविष्यात नक्की काम मिळेल चांगला संवाद साधता येणं ही पहिली पायरी आहे. स्वतःला बदला तरच आपल्याला दुसऱ्या गोष्टीत बदल दिसेल. त्यासाठी स्वतःला गुंतवून घ्या. उद्याचा दिवस आपल्या हातात नसतो, म्हणून जे करायचे ते आजच करायला सुरवात करा. दुनिया जे करते त्यात आपण वेगळेपण आणायचा प्रयत्न करा. 

मुळात शिकणे म्हणजे पैसा कमविणे नव्हेच. केवळ पैसा कमविण्यासाठी आपण शिकत नसतोच असे असले तरी पैसे कमविण्यासाठी नोकरी आणि व्यवसाय हेच दोन मार्ग आहेत. या दोन्हीसाठी लागणाऱ्या आवश्‍यक गोष्टी कोणत्या याची जाणिव तरुणांना होणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांनी अधिकाधिक व्यवसायात उतरायला हवे, यानेच देश महासत्ता होण्यास मदत होणार आहे. डिजीटल मार्केटिंगमुळे जग जवळ आले आहे, संकल्पना स्पष्ट असल्या की जगणे सुकर होते. यावेळी श्री गुडगिला यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकला संवाद साधला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवर टीका; म्हणाले, काँग्रेसची जिझिया कर लावण्याची इच्छा

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT