मराठवाडा

कंपाऊंडरच करतात डॉक्टरांचे काम, लातूर जिल्ह्यातील प्रकार

विश्वनाथ गुंजाेटे

किल्लारी (जि.लातूर) ः लामजना (ता.औसा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र असूनही रुग्णांची गैरसोय होत आहे. आरोग्य केंद्रातील डॉक्टर उपचारासाठी वेळेवर उपलब्ध होत नाहीत. अनेकदा कंपाउंडरच डाॅक्टरांचे काम करतात. येथे मंगळवारी (ता.१८) दुपारी चार ते पाच यादरम्यान कंपाऊंडरनेच अनेक रुग्णांची तपासणी करून औषधांची चिठ्ठी (प्रिस्क्रिप्शन) दिले. त्यानुसार औषध गोळ्यांचे वाटपही करण्यात आले.


येथे तीन डॉक्टरांची नियुक्ती असून मंगळवारी दुपारी एकही डॉक्टर उपस्थित नव्हते, असे प्रकार या ठिकाणी वारंवार घडत असल्याच्या तक्रारी उपस्थित रुग्णांनी केल्या. दुपारी चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान या ठिकाणी वीसवर रुग्णांनी आपल्या आरोग्याबाबतच्या तक्रारीसंबंधी सल्ला व औषधोपचारासाठी चिठ्ठी काढली होती. मात्र त्यांची तपासणी डॉक्टरांनी तर केली नाही. मात्र कंपाउंडरने डॉक्टर असल्याचे भासवत तपासणी करून त्यांना औषध गोळ्या लिहून दिल्या. दिलेल्या औषधाच्या चिठ्ठीनुसार औषधविक्रेत्याने गोळ्याही दिल्या. जर कंपाऊंडरच रुग्णांची तपासणी करत असतील तर याठिकाणी तीन डॉक्टरांना मोठ्या पगारी देण्याची काय आवश्यकता आहे.

येथील डॉक्टरांची नियुक्ती रद्द करून शासनाने कंपाऊंडरलाच या ठिकाणी नियुक्त करावे, असा खोचक सल्ला रुग्णांच्या नातेवाइकांनी दिला. रुग्णांच्या नातेवाइकांनी यावेळी जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना फोनवरून संपर्क साधून संबंधित घटनेबाबत तक्रारी केल्या. त्यावर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी याची चौकशी करू असे आश्वासन रुग्णांच्या नातेवाइकांना दिले असल्याचे रुग्णाचे नातेवाईक कमलाकर शिंदे यांनी सांगितले.


विजेचा धक्का लागलेल्या रुग्णास दवाखान्यात दाखल केले असता क्वॉर्टरहून दवाखान्यात येण्यासाठी डॉक्टरला अर्धातास तास लागला. अशा प्रकारे रुग्णांची नेहमीच गैरसोय होते.
वेळेवर डॉक्टर हजर नसतात. याबाबत ग्रामसभेमध्ये ठरावही मांडलेला होता.
- सचिन कांबळे, ग्रामस्थ

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना फोनवरून संपर्क केला. त्यावर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी करू असे आश्वासन दिले.
- कमलाकर शिंदे, रुग्णांचे नातेवाईक

कर्मचारीच चालवतात लामजना येथील प्राथमिक आरोग्य केंद्र. तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. डॉक्टर नावालाच आहेत. कंपाऊंडरच पाहतात रुग्ण.
- अनिल पाटील, ग्रामस्थ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT