download.jpg 
मराठवाडा

ढगाळ वातावरणाने वाढली शेतकऱ्यांमध्ये चिंता

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली ः जिल्‍ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे रब्‍बीतील हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाला असून कळमनुरी तालुक्‍यातील बाळापूर, पोतरा, बोल्‍डा तर वसमत  तालुक्‍यातील आडगाव, हट्टा, करंजाळा भागात रविवारी सायंकाळी (ता.दोन) पावसाचा शिडकावा झाला. यामुळे तुर पिकांच्या काढणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ झाली होती. 

जिल्‍ह्यात मागच्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने तुर काढणीची कामे करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ होत आहे. रविवारी सायंकाळी कळमनुरी तालुक्‍यातील बाळापूर, पोतरा, बोल्‍डा, येहळेगाव वसमत तालुक्‍यातील हट्टा, आडगाव, बोरी सावंत, करंजाळा तर औढा तालुक्‍यातील गोजेगाव भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. यामुळे या भागात तुर काढणी करणाऱ्या शेतकऱ्यांची धावपळ झाली. सध्या अनेक शेतकऱ्यांनी तुर काढणीची कामे सुरू केली आहेत. 

ट्रॅक्‍टरच्या माध्यमातून तुर काढणी सुरू
वातावरणाच्या बदलाचा हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाला असून फुलगळती देखील होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. जिल्‍ह्यात एक लाख ३१ हजार ५३ हेक्‍टरवर रब्‍बीचे क्षेत्र आहे. त्‍यात हरभरा पिकाचे ९२ हजार ६८४ हेक्‍टरवर लागवड झाली आहे तर २६ हजार ६२४ हेक्‍टरवर गव्हाचे पिक आहे. तुरीचे क्षेत्र ५०४९४ हेक्‍टरवर आहे. अनेक शेतकऱ्यांनी तुर पिकाच्या काढणीचे कामे सुरू केली आहेत. बदललेल्या वातावरणामुळे तुर काढणीची कामे तातडीने केली जात आहेत. अनेक शेतकऱ्यांनी तुर बडविण्याऐवजी ट्रॅक्‍टरच्या माध्यमातुन तुर काढणीची कामे हाती घेतली आहेत. 

कधी दाट धुके, ढगाळ वातावरणाचा फटका
यावर्षी खरीपाच्या हंगामातील सोयाबीन पिकाचे परतीच्या पावसाने नुकसान झाले आहे. त्‍यामुळे शेतकऱ्यांनी त्‍याची कसर रब्‍बीत असा अंदाज व्‍यक्‍त करत पेरणी केली. मात्र, या पिकाला देखील कधी दाट धुके, ढगाळ वातावरणाचा फटका बसत आहे. औंढा नागनाथ तालुक्‍यातील गोजेगाव, साळणा आदी भागात टाकळी ज्‍वारीचा पेरणी अधिक आहे. या भागात देखील बदललेल्या वातावरणाचा फटका पिकांना बसत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. तुर कापणीनंतर त्‍याच्या पेंढ्या शेतकऱ्यांनी बांधून ठेवल्या आहेत. बदलेल्या वातावरणामुळे ते झाकण्यासाठी शेतकऱ्यांनी पानकापड शेतात नेऊन ठेवले आहेत. 

हरभरा पिकाची फुलगळती 
मागच्या दोन दिवसांपासून बदलेल्या वातावरणामुळे हरभरा पिकाची फुलगळती होत असून अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. तर तुर काढणीची कामे यामुळे लगबगीने करावी लागत आहेत. यासाठी ट्रॅक्‍टरचा उपयोग करावा लागत असल्याने खर्च वाढत आहे. तुरीचे पिक हातात येईपर्यंत किती उतारा येईल ते सांगता येत नाही. - रमेश भुक्‍तर, शेतकरी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

C.P. Radhakrishnan Vice President of India : सी. पी. राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती; इंडिया आघाडीच्या बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव!

Sanjay Dutt: अजय देवगन संजय दत्तचा फॅमिली डॉक्टर? संजय दत्तचे हैराण करणारे खुलासे

नेपाळमध्ये हिंसक आंदोलन! राष्ट्रपती-पंतप्रधानांसह मोठ्या नेत्यांचा राजीनामा, पण ज्यांच्या आदेशाने देश पेटला ते सुदान गुरुंग कोण?

Latest Marathi News Live Updates: अमळनेरात तणावाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक

Pali News : पाली नगराध्यक्ष पदासाठी घोडेबाजार! महायुतीमध्येच कुरघोडी व चढाओढ, भाजप व शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये थेट लढत

SCROLL FOR NEXT