Ashok Chavan
Ashok Chavan 
मराठवाडा

मिसेस चव्हाणांसमोरच अशोक चव्हाणांना विचारला नको तो प्रश्न

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : काँग्रेस पक्षाच्या विरोधकांनी पातळी सोडून अपप्रचार सुरू केला आहे. त्यांनी भलेही पातळी सोडली असेल; पण त्यांना प्रत्युत्तर देताना काँग्रेस सोशल मीडियाने आपला संयम सोडू नये, असे आवाहन राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे.

येथील कुसूम सभागृहात झालेल्या काँग्रेस सोशल मीडियाच्या बैठकीत त्यांनी हे विधान केले. सोशल मीडियाच्या निवडक पदाधिकाऱ्यांची ही बैठक सोमवारी सकाळी डॉ. शंकरराव चव्हाण स्मृती संग्रहालयात नियोजित होती. परंतु, ‘दिलखुलास चर्चा’ असे नाव दिलेल्या या बैठकीच्या निमंत्रणात अशोक चव्हाण यांचे ‘मला तुमच्याशी बोलायचंय... तुमचंही ऐकून घ्यायचंय...’ असे भावनिक आवाहन असल्याने निमंत्रितांसोबतच जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून शेकडो तरूण स्मृती संग्रहालयात दाखल झाले. तेथील सभागृह तुडूंब भरल्यानंतर ऐनवेळी खालच्या मजल्यावर स्क्रीन लावून अनेकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली. मात्र तरीही गर्दीचा ओघ कायम असल्याने ती जागासुद्धा तोकडी पडली आणि अखेरच्या क्षणी ही बैठक शेजारच्या कुसूम सभागृहात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीला अशोक चव्हाणांसह आ.सौ. अमिताताई चव्हाण आणि कन्या श्रीजया चव्हाण देखील उपस्थित होत्या. जीन्स घातलेले अशोक चव्हाण पाहून अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. बैठकीची छोटेखानी प्रस्तावना करताना त्यांनी सोशल मीडियाचे महत्व विषद केले. आजच्या युगात अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया हे सर्वाधिक प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. केवळ राजकारणासाठी नव्हे तर सामाजिक समस्या सोडविण्यासाठी देखील या माध्यमाचा उत्तम उपयोग केला जाऊ शकतो, असेही ते म्हणाले. 

काँग्रेसच्या विरोधकांनी प्रचारात आणि सोशल मीडियावर सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. धादांत खोटा प्रचार चालवला आहे. काँग्रेसच्या सोशल मीडियाने त्यांना चोख प्रत्युत्तर जरूर द्यावे. मात्र उत्तर देताना पक्षाच्या संस्कृतीचा विसर पडू देऊ नका, असे चव्हाण यांनी यावेळी सांगितले. सोशल मीडियावर चांगले काम करणाऱ्या सदस्यांना पक्षाच्या मुख्य प्रवाहात काम करण्याची संधी दिली जाईल, अशी घोषणा त्यांनी करताच टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. 

त्यानंतर अशोक चव्हाणांनी उपस्थितांचेही म्हणणे ऐकून घेतले. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी थेट मंचावरून खाली उतरून संवाद साधल्याने सभागृहात एकच उत्साह संचारला होता. यावेळी अनेकांनी अगदी मोकळेपणाने आपल्या भावना व्यक्त केल्या. काहींनी आपल्या भागातील समस्यांना वाचा फोडली, तर काहींनी सरकारच्या निर्णयांमुळे बेरोजगारी वाढून युवकांचे नुकसान होत असल्याची व्यथा मांडली. यावर उत्तर देताना अशोक चव्हाण यांनी या समस्या संपवण्यासाठी आपण सोशल मीडियावर काँग्रेसची बाजू अधिक भक्कमपणे मांडून आपले सरकार आणले पाहिजे, असे सांगितले. 

काँग्रेसचा प्रचार करतो म्हणून भाजपकडून धमकावले जात असल्याची तक्रारही यावेळी अनेकांनी केली. ही तक्रार येताच सौ. अमिताताई चव्हाण उभ्या झाल्या आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना धमक्या आल्यास त्यांनी माझ्याकडे यावे. धमक्या देणाऱ्यांना मी पाहून घेईन, असा सूचक इशाराच त्यांनी दिला. सौ. अमिताताईंनी कार्यकर्त्यांच्या पाठीशी आक्रमकपणे उभे राहण्याची घोषणा करताच सभागृहात टाळ्या अन् शिट्ट्यांचा जणू पाऊसच पडला. 

कार्यक्रमाच्या अखेरीस अशोक चव्हाण यांनी सोशल मीडियावर आलेल्या काही वैयक्तिक प्रश्नांनाही दिलखुलास उत्तरे दिली. एका कार्यकर्त्याने आवडती अभिनेत्री कोण, असा प्रश्न विचारला. त्याचे उत्तर मी तुम्हाला एकट्यात देतो, असे त्यांनी म्हणताच सभागृहात एकच हंशा पिकला. जीन्स घालून आलेल्या चव्हाणांना आणखी काय-काय घालायला आवडते, या प्रश्नाला त्यांनी ‘ये अंदर की बात हैं’ असे मिश्किल उत्तर दिले. आवडी-निवडी आणि दिनचर्येबाबतही आलेल्या प्रश्नांनाही त्यांनी मनमोकळी उत्तरे दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'7 दिवस पत्नी अन् 7 दिवस प्रेयसीसोबत राहतो'; कराराच्या आधारे कोर्टाने केली आरोपीची सुटका

Sanju Samson Fined : अंपायरशी वाद घालणे आले अंगलट... BCCI ची संजू सॅमसनवर मोठी कारवाई; काय आहे संपूर्ण प्रकरण

Kolhapur Lok Sabha : मुश्रीफांच्या सांगण्यावरून कारवाई करत असाल तर मीही छत्रपतीये, याद राखा; संभाजीराजेंचा कोणाला इशारा?

Latest Marathi News Live Update : नंदुरबार येथे काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची उद्या सभा

Share Market Opening: गुंतवणूकदार चिंतेत! शेअर बाजारात पुन्हा घसरण; 'या' शेअर्सचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT